ताज्या बातम्यासामाजिक

महावितरणचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र युद्ध पातळीवर विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी झटत आहे…

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात अवकाळी पाऊस व वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झालेले आहे.

नातेपुते (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अवकाळी पाऊस व वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागांचे अतोनात नुकसान होऊन पत्राशेड, घराची पडझड, लाईटचे पोल पडलेले आहेत. झाडे उनमळून पडलेले आहेत त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे. लाईटच्या पोलमुळे अनेकांचे संपर्क तुटलेले आहेत. विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता काळे साहेब, नातेपुते उपकार्यकारी अभियंता सोनवणे साहेब, सोलापूर जिल्हा समन्वयक रुपनवर साहेब त्यांच्यासह शाखा अभियंता, कर्मचारी, वायरमन, लाईनमन व त्यांना मदत करणारे कर्मचारी झटत आहेत. महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने सलाम करावा अशा पद्धतीने काम सुरू आहे.

अवकाळी पाऊस व वारा असल्याने जमीन भुसभुशीत होते. त्यामुळे लाईटचे पोल, डीपी कोलमडले जातात. यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो. तर काही वेळेला खंडित करावा लागतो, अशा वेळेला शेतकरी व सर्व सामान्य नागरिक यांना लाईट नसल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. याचसाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी विस्कटलेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत. वेळेचे भान न ठेवता, रात्री-अपरात्री काम सुरू आहे. अंधारामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलवर जावे लागत आहेत. रात्रीच्या अंधारात तारा ओढून पोलवर ओढाव्या लागत आहेत. झाडाझुडपांमुळे तारा ओडीत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्याच ठिकाणी त्यांना थांबावे लागत आहेत. कितीतरी वेळा गावाच्या किंवा वाड्यावर आडबाजूला लाईटचे काम सुरू असते. अशा वेळेला स्थानिक नागरिक व शेतकरी यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करून त्यांना चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था झालेली आहे का नाही याची सुद्धा विचारपूस करणे गरजेचे आहे.

वेळेचे भान न ठेवता ते जनतेसाठी अहोरात्र कष्ट करीत आहेत. जेणेकरून शेतकरी व ग्राहकांना लवकरात लवकर वीज पुरवठा होऊन जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी काम करीत आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort