ताज्या बातम्या

अकलूज येथे चार चाकी वाहन झाडाला धडकून भीषण अपघातात दोन जागीच ठार तर, दोन गंभीर जखमी

अकलूज (बारामती झटका)

अकलुजमध्ये रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहन झाडाला धडकुन झालेल्या भिषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले तर दोघांवर अकलुज येथील दोन वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार चालु आहेत.

याबाबत पोलीसांकडुन मिळालेली अधिक माहिती अशी कि, शंभर फुटी बायपास रोडवर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास महर्षि चौक ते जयसिंह चौक रोडवर निसान कंपनीच्या टेरानो गाडी नं. MH 45 N 0008 मधुन शुभम बाळु चव्हाण (वय २३), यश नवनाथ शिंदे (वय २०) दोघे रा. वेळापुर, ता. माळशिरस, राहुल बापुसाहेब कोळेकर (वय २४) रा. उघडेवाडी, ता.माळशिरस, समाधान बुवा सरतापे (वय २३) रा. खुडूस, ता. माळशिरस हे चौघे रात्री ११ वा. सुमारास महर्षि चौकातुन जयसिंह चौकाकडे चालले होते. वाहन अतिवेगात असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अनियंत्रित वाहन रस्त्याच्या बाजुला असलेल्या दोन झाडांवर जोरदार धडकले.

अपघात एवढा भीषण होता की पाठीमागे बसलेला राहुल बापुसाहेब कोळेकर याचे शिर धडावेगळे होवुन रस्त्यावर पडले तर त्याच्या शेजारी बसलेला समाधान सरतापे याला गंभीर दुखापत होवुन तो ही जागीच ठार झाला. पुढे बसलेले शुभम चव्हाण व यश शिंदे हे जखमी झाले आहेत. शुभम व यश गाडीतील एअर बॕगमुळे बचावले असुन त्यांच्यावर अकलुज येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालु आहेत. सदरचे वाहन कोण चालवत होते हे अद्याप समजु शकले नाही. सदर अपघाताचा महिला पोलीस अधिकारी स. पो. नि. महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort