सुनेत्राताई पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2024/06/sunetra-pawar-nomination-for-rajyasabha_2024061248723-780x470.jpg)
बारामती (बारामती झटका)
बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाल्यावर आता सुनेत्राताई पवार संसदेत बॅकडोअर एन्ट्री घेणार आहेत. सुनेत्राताई पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्राताई पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. विधानभवनात जाऊन सुनेत्राताई पवारांनी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ उपस्थित होते. सुनेत्राताई पवार या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे बारामतीत अजित पवार गटाला बळ मिळाले आहे. सुनेत्राताई पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज आलेला नाही.
यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सुनेत्राताई पवार म्हणाल्या कि, राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिल्याने अजित पवार, कार्याध्यक्ष व कार्यकर्ते यांचे आभार मानते. दिलेल्या संधीचे सोनं करेल. लोकसभेच्या उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आली होती. या उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आली आहे. माझ्यावर जो विश्वास पक्षाने दाखवला आहे, त्यांचे मी आभार मानते.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2024/06/images-1.jpeg)
शहर आणि तालुक्यात सर्व संस्थांवर वर्चस्व असताना सुनेत्राताई पवार यांचा झालेला पराभव संस्थेचे प्रमुख, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या जिव्हारी लागला होता. सुनेत्राताई पवार यांच्या पराभवानंतर अजितदादा पवार गटात कमालीची शांतता होती. मात्र, आज त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.