ताज्या बातम्या

गुरुमाऊली फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स भव्य शोरूमचा माळशिरस येथे शुभारंभ होणार

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस नगरपंचायत हद्दीत गुरुमाऊली फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स अकलूज रोड, देववकील वस्ती, माळशिरस या भव्य शोरूमचा शुभारंभ दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मंगळवार दि. 14/11/2023 रोजी दुपारी 12.45 वाजता सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे सौ. सुभद्रा व श्री. बबन गणपत रासकर, सौ. वृषाली व श्री. बाबा बबन रासकर, सौ. निर्मला व श्री. संतोष बबन रासकर, सौ. सुनीता व श्री. दीपक बबन रासकर आणि समस्त रासकर परिवार यांच्यावतीने कार्यक्रमास व स्नेहभोजनास उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

माळशिरस शहरातील सोज्वळ व सुसंस्कृत व्यक्तिमत्व असणारे बबनराव रासकर यांनी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी करून सध्या सेवानिवृत्त आहेत. त्यांना ब्रह्मा विष्णू महेश अशी त्रिमूर्ती बाबा, संतोष, दीपक अशी तीन मुले आहेत. गुरुमाऊलींचा आशीर्वाद, आई-वडिलांचे संस्कार आणि परिस्थितीची जाण असल्याने तिन्ही बंधूंनी समाजामध्ये उद्योग व्यवसायातून रासकर परिवारांचे वेगळे अस्तित्व निर्माण केलेले आहे. सौ. सुभद्रा व श्री. बबनराव रासकर यांच्या संस्काराची शिदोरी शुद्ध आचार विचार व प्रामाणिकपणाच्या जोरावर उद्योग व्यवसायामध्ये दिवसेंदिवस प्रगती केलेली आहे.

माळशिरस शहरात भाडोत्री जागेत फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय सुरू होता. अकलूज रोड, देव वकील वस्ती येथील स्वतःच्या जागेमध्ये गुरुमाऊली भव्य शोरूम उभारलेले आहे. त्याचा शुभारंभ दीपावली पाडव्यानिमित्त होणार आहे. गुरुमाऊली फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स या भव्य शोरूमला बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्यावतीने हार्दिक शुभेच्छा ! तरी सर्व रासकर परिवार यांच्या विनंतीस मान देऊन कार्यक्रमाच्या घाईगडबडीत हस्ते पर हस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे नातेवाईक व मित्रपरिवार यांना विसरून गेले असतील तर हेच निमंत्रण समजूनच येण्याचे अगत्य करावे, असे रासकर परिवार यांच्याकडून नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort