पिसेवाडी (जानकर वस्ती) येथे मायाक्का दूध संकलन केंद्राचे उद्घाटन संपन्न
पिसेवाडी (बारामती झटका)
पिसेवाडी ता. माळशिरस येथील दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जानकर वस्ती येथील श्री नवनाथ जानकर यांनी मायाक्का दूध संकलन चालू करून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले आहे. तसेच चांगल्या प्रकारे दर देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमासाठी जनतेच्या मनातील सरपंच बापूसाहेब वाघमारे (कोरटे), संकलन केंद्राचे चेअरमन नवनाथ जानकर, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष साहिल आतार, बापू खरात, कल्याण काळे, कालिदास खंडागळे, नवनाथ खरात, अनिल राचकर, एकनाथ जानकर, शिवाजी मोरे, अमोल जानकर, संतोष पवार, सागर ढाकणे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.