ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस तालुक्यातील चि. यशराज याचा सोलापूर जिल्ह्यात अटकेपार झेंडा; 4 सदस्यांचे डिपॉझिट जप्त करून 82 टक्के मतदान घेतले.

सवतगव्हाण (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील सवतगव्हाण ग्रामपंचायतीत थेट जनतेतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या चुरशीच्या व रंगतदार निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मध्ये चिरंजीव यशराज नितीनराजे निंबाळकर याचा सोलापूर जिल्ह्यात निवडणुकीचा अटकेपार झेंडा गेलेला आहे. वार्डात प्रतिस्पर्धी चार उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून मतदान झालेल्या मतदानामध्ये 82% मतदान घेऊन दैदीप्यमान विजय मिळवणारा सोलापूर जिल्ह्यात तरुणाईचा आयडॉल ठरलेला आहे.

प्रभाग क्रमांक दोन कांबळे सचिन बलभीम 5 ,जाधव जयश्रीराम विठ्ठल 63, देखणे जयश्री हनुमंत 6, निंबाळकर यशराज नितीन 423, मोरे मिलिंद महादेव 15, नोटा 11 एकूण मतदान 523 झालेले होते.

सवतगव्हाणचे माजी सरपंच स्वर्गीय रावसाहेब निंबाळकर यांचे नातू व अकलूज खरेदी विक्री संघाचे चेअरमन व माजी सरपंच नितीनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत. माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या विचारावर राजकारण व समाजकारण करणारे माळीनगर व सवतगव्हाण येथील निंबाळकर परिवार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते, शिवामृत दूध संघाचे चेअरमन भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सवतगव्हाण ग्रामपंचायतीची निवडणूक माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागाचे नेते खरेदी विक्री संघाचे चेअरमन नितीनराजे निंबाळकर यांनी थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच रीना पवार व तीन सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली होती. उर्वरित सदस्यांच्या निवडीमध्ये पहिल्यांदाच चिरंजीव यशराज निंबाळकर यांना ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक दोन मधून उभे केलेले होते. यशराज यांच्या विरोधी चार सदस्य उभे होते. निंबाळकर घराण्याचा सामाजिक कार्याचा व राजकारणाचा वसा उपयोगी येऊन मतदारांनी व तरुणांनी निवडणूक हातामध्ये घेऊन यशराज निंबाळकर यांचा सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत अटकेपार झेंडा फडकविलेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच चार सदस्यांची डिपॉझिट जप्त करून झालेल्या मतदानापैकी 82 टक्के मतदान घेणारा चिरंजीव यशराज नितीनराजे निंबाळकर याने राजकारणात नवा इतिहास निर्माण केलेला आहे. यशराज निंबाळकर यांच्या यशाबद्दल तालुक्यातून व तालुक्याच्या बाहेरून कौतुक केले जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort