चि. अजित काळे आणि चि.सौ.कां. शिवानी गडदे यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार….
श्री. गणपत काळे, विझोरी आणि श्री. संजय गडदे पळशी यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत जुळणार आहेत.
माळशिरस (बारामती झटका)
स्व. महादेव रंगनाथ काळे यांचा नातू व सौ. वैशाली व श्री. गणपत महादेव काळे, रा. विझोरी, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव अजित काळे आणि श्री. तुकाराम लक्ष्मण गडदे माजी सरपंच यांची नात व सौ. सविता व श्री. संजय तुकाराम गडदे सर रा. पळशी, दोन मळा, ता. पंढरपूर, यांची सुकन्या चि.सौ.कां. शिवानी गडदे यांचा शाही शुभ विवाह सोहळा मंगळवार दि. २८/२/२०२३ रोजी दुपारी १२ वाजून ४७ मिनिटे या शुभ मुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, अकलूज-माळशिरस रोड ६१ फाटा, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे प्रेषक पूजा नीम ॲग्रो इंडस्ट्रीचे उद्योजक गणपत महादेव काळे, यशराज पीव्हीसी पाईप इंडस्ट्रीचे उद्योजक तानाजी महादेव काळे, सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग महाराष्ट्र राज्य तथा समाजरत्न पुरस्कार प्राप्त श्री. तुकाराम सिताराम काळे, शंकरराव मोहिते पाटील सूतगिरणीचे चेअरमन श्री. तुकाराम सुभेदार काळे, उदय कीर्ती धनलक्ष्मी ज्वेलर्सचे श्री. बाबुशेठ शिवाजी चव्हाण पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. भीमराव जगन्नाथ काळे यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.
सर्व मित्र परिवार व नातेवाईक यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्ते परहस्ते लग्नाचे आमंत्रण व निमंत्रण केले आहे. नजर चुकीने आपण राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे आवाहन वर पिता श्री. गणपत महादेव काळे व समस्त काळे परिवार विझोरी यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng