Uncategorizedताज्या बातम्या

‘छात्रतेज संभाजीराजे’ विषयांवर सुरेश पवार गुरुजी यांचे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान

सोलापूर (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात छ. संभाजीराजे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मरवडे येथील छत्रपती परिवाराचे संस्थापक तथा शिक्षक समितीचे नेते सुरेश पवार यांचे “क्षात्रतेज संभाजीराजे” या विषयांवर अत्यंत ओजस्वी व्याख्यान झाले. एक तासाहून अधिक वेळ चाललेल्या या व्याख्यानातून शस्त्र व शास्त्र पारंगत छ. संभाजीराजांचा जीवनपट उलगडून दाखवितानाच एकाच वेळी अनेक आघाड्यांवर शत्रूंशी दिलेल्या लढ्याचे रोमहर्षक वर्णन करुन त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

अल्प आयुष्य लाभलेल्या छत्रपती संभाजी राजांचे चरित्र भुरळ घालणारे आहे संभाजी राजे सुसंस्कृत आणि राजकारणी होते मोगल आदिलशहा सिद्धी पोर्तुगीजांच्या विरोधातील लढाई राजकीय होती धार्मिक नव्हती ते कधीही कोणाशीही धार्मिक द्वेषाने वागले नाही असे प्रतिपादन सुरेश पवार यांनी केले. ते पुढे म्हणाले, संभाजीराजे जसे तलवारबाजीमध्ये निपुण होते तसेच ते ज्ञान क्षेत्रात अर्थात साहित्य क्षेत्रात देखील निपुण होते. संस्कृत, हिंदी, मराठी, इंग्रजी इत्यादी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहीनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, शिक्षणाधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी श्रीमती सुलभा वठारे, उपमुख्य वित्त व लेखाधिकारी उत्तमराव सुर्वे, कार्यकारी अभियंता कुलकर्णी सो. यांच्यासह सोलापूर जिल्हा परिषदेतील विविध खात्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास गुरव यांनी केले तर आभार संयोजक अविनाश गोडसे यांनी मानले. यावेळी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन म. ज. मोरे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामराव शिंदे, लक्ष्मण काटेकर, माधुरी भोसले, अनिरुद्ध पवार, राजन ढवण, प्रशांत लंबे, शाम पाटील यांच्यासह शिक्षक बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व शिवप्रेमींना मानाचा फेटा बांधण्यात आल्याने संपूर्ण सभागृहात भगवेमय वातावरण तयार झाले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button