ताज्या बातम्या

मांडवे ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर..

मांडवे (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. शीतल अर्जुन दुधाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

मांडवे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा निवडणूक कार्यक्रम गुरुवार दि. 19/09/2024 रोजी सकाळी 10 ते 12 नामनिर्देशन पत्र, दुपारी 12 ते 01 छाननी, 01 ते 02 उमेदवारी अर्ज मागे घेणे, दुपारी 02 नंतर सरपंच पदाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

मांडवे ग्रामपंचायतीत 17 सदस्य आहेत. हनुमंत भीमराव टेळे, पंचशीला रामचंद्र गायकवाड, शितल अर्जुन दुधाळ, स्वाती तानाजी दुधाळ, तात्याबा पांडुरंग शिंदे सुरज दिनकर साळुंखे, बाळाबाई सुनील खुडे, विठ्ठल ज्ञानेश्वर पालवे, अश्विनी गजानन पालवे, हसीना रफिक मुलाणी, रितेश बबन पालवे, शोभा नाथा सिद, तानाजी जगन्नाथ पालवे, स्वाती राजेंद्र शिंदे, मनीषा कुमार पाटील, आनंदीबाई शिवाजी ढोबळे, मालन बबन खोमणे असे सदस्य आहेत. सरपंच शितल अर्जुन दुधाळ यांनी राजीनामा दिलेला असल्याने प्रभारी सरपंच पदाचा मालन बबन खोमणे यांच्याकडे पदभार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
08:19