जाधव कुटुंबीयांचे परिसरातील जनसामान्यांसाठी मोठे कार्य – निनाद पाटील
माळशिरस पंचायत समितीचे गटनेते रणजीतसिंह जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या…
मळोली (बारामती झटका)
मळोली ता. माळशिरस, गावचे माजी सरपंच माळशिरस पंचायत समितीचे गटनेते मळोली ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक रणजितसिंह जयसिंगराव जाधव यांच्या कुटुंबाचे या परिसरातील सर्वसामान्य जनतेसाठी मोठे कार्य असून शिक्षण क्षेत्रातही त्यांनी चांगले काम केले असल्याचे प्रतिपादन पत्रकार निनाद पाटील यांनी केले. ते मळोली ता. माळशिरस, येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांना पंचायत समितीचे सदस्य रणजितसिंह जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर इंगळे सरदेशमुख व शेतकरी संघटनेचे हरिआप्पा नारायण जाधव यांच्या वतीने वह्या वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मळोलीच्या सरपंच सौ. अर्चना रणजितसिंह जाधव या होत्या. यावेळी व्यासपीठावर मळोलीच्या सरपंच सौ. अर्चना जाधव, नानासाहेब पाटील, सुरेशदादा जाधव, प्रभाकर इंगळे सरदेशमुख, हरीआप्पा जाधव, ज्ञानेश्वर ढेंबरे, पर्यवेक्षक तानाजी लवटे, संजय गुजर, पत्रकार निनाद पाटील, बारामती झटका वेब पोर्टल व यूट्यूब चॅनेलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील, महादेव जाधव आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वांचे स्वागत पृथ्वीराज जाधव यांनी केले. यानंतर सरपंच सौ. अर्चना जाधव, पत्रकार निनाद पाटील, श्रीनिवास कदम पाटील, महादेव जाधव आदींच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी निनाद पाटील म्हणाले की, रणजितसिंह जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटपाचा कार्यक्रम हा चांगला उपक्रम असून वह्या वाटप करण्या पाठीमागची भावना चांगली आहे. या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठी मदत होत असल्याचे यावेळी निनाद पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला जनता विद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पृथ्वीराज जाधव यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng