खुडूस येथे ईद-ए-मिलाद निमित्त मोफत आरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

खुडूस (बारामती झटका)
लोकन्याय सेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व महिबूब अब्बास काझी युथ फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज व खुडूस मुस्लिम जमात यांच्या संयुक्त विद्यमाने ईद-ए-मिलाद निमित्त मोफत आरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवार दि. २९/८/२०२६ रोजी सकाळी ९.३० ते ५ या वेळेत खुडूस (मेन बाजार पेठ), ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.
या मोफत आरोग्य शिबिरामध्ये मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप, मोफत हृदयरोग तपासणी, ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, मोफत युरोलॉजी तपासणी, लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट, तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले रेटीना, मणका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया, अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत कॅन्सर तपासणी, लहान बाळाच्या हृदयास छिद्र असणे, मधुमेह (RBS), ECG, BP, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, आतड्याला पिळ पडणे, अन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी, मोफत वॉल रिप्लेसमेंट, मोफत डिव्हाइस क्लोजर, ब्रेन व स्पाईन सर्जरी, जॉईंट रिप्लेसमेंट, किडनी स्टोन, प्रोस्टेट, सर्व प्रकारच्या हार्निया इत्यादी आरोग्यविषयक समस्यांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

या शिबिराच्या अधिक माहितीसाठी श्री. आसिफ शेख मो. ८६००८८५१८८ / ७५७५८३५२५२, श्री. शकील पठाण मो. ९५६१३१३२९२, श्री. राहील शेख मो. ९०२८४३९०८४, श्री. शाहरुख शेख मो. ९६०७८१४८५२, श्री. सचिन करडे मो. ७०२०६५८७३१ यांच्याशी संपर्क साधावा.
या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे व भव्य रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन संयोजक समीर भैया काझी अध्यक्ष, मुस्लिम जमात खुडूस, संस्थापक अध्यक्ष, लोकन्याय सेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व महिबूब अब्बास काझी युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



