तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उद्घाटन केलेल्या विजयगंगा प्रकल्पाची चौकशी करावी….

विजयगंगा प्रकल्प दोन टप्प्यात कामे झालेली होती, सदरच्या कामांचे टेंडर प्रोसेस व प्रत्यक्ष काम याची पाहणी देवेंद्रजी फडवणीस यांच्या टीमने करावी, अशा मागणीने जोर धरलेला आहे.
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा, यासाठी विजयगंगा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केलेले होते. विजयगंगा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये झालेला होता. पहिल्या टप्प्यामध्ये भांब, रेडे, कण्हेर, इस्लामपूर या गावांचा समावेश होता तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जाधववाडी, भांबुर्डी, येळीव आणि पुरंदावडे या गावांचा समावेश होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उद्घाटन केलेल्या विजयगंगा प्रकल्पाची चौकशी करावी.

विजयगंगा प्रकल्प दोन टप्प्यात कामे झालेली होती. सदरच्या कामाचे टेंडर साई फाउंडेशन यांच्या नावाने दिलेले होते. सदर टेंडर प्रोसेस व प्रत्यक्ष कागदावरील काम व ओढ्यावर झालेले काम याची पाहणी देवेंद्रजी फडणवीस यांच्या टीमने करावी, अशा मागणीने जोर धरलेला आहे. कारण विजयगंगा प्रकल्पामध्ये पाण्यापेक्षा जास्त पैसाच मुरलेला आहे, अशी विजयगंगा प्रकल्प झालेल्या गावातील सुज्ञ नागरिकांची उघड उघड चर्चा सुरू आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर माळशिरस तालुक्यातील विजयगंगा प्रकल्प पासून सुरुवात करावी, अशी माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.