माळशिरसमध्ये १० नोव्हेंबरला भव्य स्नेहमेळावा व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. रंजन कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सातारा श्री. संतोष पाटील व सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत…
ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्राचा पाचवा वर्धापन सोहळा; प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, मान्यवर व गुणवंत खेळाडूंचा होणार सन्मान
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र, माळशिरस व अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्नेहमेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या पाचव्या वर्षानिमित्त आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, नूतन अधिकारी, कर्मचारी तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस–अकलूज रोड, ६१ फाटा, माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. रंजन कुमार शर्मा (IPS) भूषविणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मा. श्री.संतोष पाटील (IAS) आणि सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी (IPS) उपस्थित राहणार आहेत.
तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त मा. श्री. बाळासाहेब वाघमोडे-पाटील (IPS), मंत्रालय मुंबई येथील सचिव मा. श्री. सदाशिव साळुंखे, गुजरात येथील पोलीस अधीक्षक मा. श्री. संजय खरात (IPS), पुरी, ओडिशा येथील उपवनसंरक्षक मा. श्री. धनंजय मगर (IFS), रणाघाट, पश्चिम बंगाल येथील उप पोलीस अधीक्षक मा. श्री. शुभम जाधव (IPS), नागपूर येथील उपवनसंरक्षक मा. श्री. शरद करे (IFS), सोलापूरचे अतिरिक्त आयकर आयुक्त मा. श्री. वैभव ढेरे (IRS) यांचा समावेश आहे.

याशिवाय मुंबई येथील पोलीस अधीक्षक मा. श्री. विश्वास पांढरे (IPS), भोपाळ, मध्यप्रदेश येथील आयकर आयुक्त मा. श्री. उमेश फडे (IRS), जिल्हा न्यायाधीश मा. श्री. उमेशराव मोरे, केरळ येथील मत्स्य व्यवसाय विभागाचे संचालक मा. श्री. सागर मिसाळ (IAS), केंद्रीय सचिव, व्यापार व उद्योग मंत्रालय, दिल्ली मा. श्री. संदीप कुमार (GCS), पुणे येथील भारतीय रेल्वे विभागाचे वाणिज्य व्यवस्थापक मा. श्री. रामदास भिसे (IRTS) आणि दिल्ली येथील परराष्ट्र मंत्रालयाचे उपसचिव मा. श्री. जयपाल ढेंढे (IFS) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सांगली येथील प्रधान मुख्य व्यवस्थापक व प्रशासक, वन्यजीवांची मा. श्री. हरिश्चंद्र बायमोडे-पाटील (IFS) यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यात चि. रुद्राक्ष बाळासाहेब वाघमोडे-पाटील यांचा विशेष नागरी सन्मान करण्यात येणार आहे. सन २०२६ मध्ये जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजी या खेळात वैयक्तिक गटात एक कांस्यपदक व सांघिक गटात दोन रौप्यपदके पटकावल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. वयाच्या २२ व्या वर्षी आतापर्यंत एकूण २५ आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई केल्याची उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली आहे. तसेच मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी वर्ग – १ या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
प्रतिष्ठानचे पदोन्नत अधिकारी व नूतन अधिकारी यांचा गौरव
या कार्यक्रमात विविध विभागांमध्ये पदोन्नती मिळविलेल्या अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी मा. श्री. कल्याण पांढरे, उपजिल्हाधिकारी मा. श्री. बाळासाहेब ढेळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग मा. श्री. सागर रमण काबळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मा. श्री. दिपाली माने, उपसचिव, कृषी विभाग, मंत्रालय मुंबई मा. श्री. गणेश संदीपान कचरे, मुख्यलेखा व वित्त अधिकारी मा. श्री. महादेव ढेळे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मा. श्री. गौरव शिवानंद बंडगर आणि मॅनेजर, महाराष्ट्र ग्रामीण बँक मा. श्री. सागर लालासो शिंदे यांचा समावेश आहे.
तसेच वर्ग – १ पदावर निवड झालेल्या नूतन अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये DYSP/ACP मा. प्रदीप दुर्योधन गोरड, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे सहाय्यक समादेशक मा. प्रज्वल राजकुमार शिंदे, सहाय्यक राजपत्रित आयुक्त मा. दिपाली शिवाजी खरात, सहाय्यक राजपत्रित आयुक्त मा. सायली शिवाजी पराडे, गटविकास अधिकारी मा. नितीन किसन आसवे, कृषी उपसंचालक मा. मयुरी संजेराव गायकवाड, उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग मा. ओंकार प्रकाश फाळके, सहाय्यक समादेशक, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मा. प्रमोद बबन जगताप, सहाय्यक राजपत्रित आयुक्त मा. डॉ. हिमालय घोरपडे, सहाय्यक राजपत्रित आयुक्त मा. समर्थ केशव रावले, उद्योग उपसंचालक मा. विक्रम अशोक शेंडे, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा मा. सागर केशव रणनवरे, कृषी उपसंचालक मा. अनिकेत शशिकांत शिंदे आणि उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग मा. अर्जुन शिवाजी कोल्हटकर यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ कर्णवर-पाटील, उपाध्यक्ष अमरसिंह पाटील व मनीषा वाघमोडे-शिंदे, सचिव सुनील कर्जे, कार्याध्यक्ष सुरेश टेळे, खजिनदार सचिन खुडे, संघटक शिशुपाल पवार, प्रसिद्धी प्रमुख विशाल पांढरे, संपर्क प्रमुख ब्रह्मदेव देशमुख, सहसचिव हनुमंत वारे, सदस्य सुभाष साळवे व स्वाती नरुटे, सदस्य धिरज चव्हाण, हनुमंत सुळे, प्रतिक्षा शेंडगे, हसन मुलाणी, प्रदीप पराडे, आनंदराव पावले आणि राजू पुले यांचा सक्रिय सहभाग आहे. याशिवाय माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे सर्व अधिकारी व कर्मचारी या सोहळ्याच्या आयोजनात सहभागी आहेत.
कार्यक्रमानंतर ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त मा. श्री. बाळासाहेब वाघमोडे-पाटील (IPS) आणि ठाणे येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी सौ. हेमांगिनी वाघमोडे-पाटील (RTO) यांच्या वतीने उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानच्या वतीने पुढील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्री. सागर शिंदे, 9850861173, श्री. चंद्रकांत लोखंडे, 9637580582, श्री. मल्हारी लोखंडे 9689110614,श्री. संभाजी वाघमोडे 8208260029, श्री. राजू हुमणे 8237807238, श्री. शरद खंडागळे 9420544991, श्री. सचिन पाटील 8275459102, श्री. संतोष पानसरे 9890538751, श्री. संदीप फुले 99070118865 आणि श्री. माणिकराव म्हेत्रे 9930601795 यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
माळशिरस तालुक्यातील भूमिपुत्र अधिकारी, विविध शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या सन्मानार्थ आयोजित हा सोहळा तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत कार्यरत अधिकारी, नव्याने निवड झालेले अधिकारी, विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध होणार आहे. माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



