ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस नगरपंचायतीचे मा. नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांच्या स्नेहभेट व दीपावली फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन…

मित्रपरिवार व नातेवाईक यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण…

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब एकनाथ देशमुख यांनी दीपावली निमित्त स्नेहभेट व दीपावली फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि. 09/11/2026 रोजी दुपारी 12 ते 06 या वेळेमध्ये श्रीनाथ विद्यालय, शिक्षक कॉलनी, म्हसवड रोड, माळशिरस येथे केले आहे.

हिंदू संस्कृतीमध्ये सणांचा राजा म्हणून दीपावली या सणाकडे पाहिले जाते. वसुबारस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा दीपावलीच्या सणांमध्ये विशिष्ट दिवसाला वेगळे महत्त्व असते.

गरिबातील गरीब व श्रीमंतातील श्रीमंत असणारे या दीपावली सणाला घरोघरी आपापल्या पद्धतीने गोडधोड करून सण साजरा करतात. अनेकजण नोकरी, उद्योग, व्यवसाय यामुळे बाहेरगावी असतात. आवर्जून या सणाला प्रत्येकजण आपापल्या गावांमध्ये येत असतात. अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. हाच उदात्त हेतू ठेवून डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी आनंदमय, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त मित्रपरिवार व नातेवाईक यांचा सुसंवाद व्हावा. त्यांच्या परिवारामध्ये नववर्ष आनंदी भरभराटीचे, प्रगतीचे व आरोग्यदायी जावो अशा पद्धतीने ईश्वरास प्रार्थना करून स्नेहभेट व दीपावली फराळ कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

तरी मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे, असे आयोजक भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य तथा माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब एकनाथ देशमुख यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button