चि. सौ. कां. अहिल्या व चि. अमोल आणि चि. विशाल व चि. सौ. कां. गौरी यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार…

श्री. मल्हारी बाबासो कर्णवर पाटील.
मा. पोलीस पाटील गोरडवाडी, जळभावी.
श्री. भागवत मल्हारी कर्णवर पाटील.
मा. चेअरमन विकास सेवा गोरडवाडी.
श्री. गोविंद मल्हारी कर्णवर पाटील.
प्र. उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज.
गोरडवाडी (बारामती झटका)
श्री. मल्हारी बाबासो कर्णवर पाटील यांची नात व श्री. शशिकांत मल्हारी कर्णवर पाटील रा. गोरडवाडी, ता. माळशिरस यांची जेष्ठ सुकन्या चि. सौ. कां. अहिल्या व स्व. भिवा सोपान कारंडे यांचे नातू व श्री. काशिनाथ भिवा कारंडे रा. महीम (कारंडेवाडी), ता. सांगोला यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमोल यांचा आणि श्री. मल्हारी बाबा कर्णवर पाटील यांचे नातू व श्री. भागवत मल्हारी कर्णवर पाटील रा. गोरडवाडी, ता. माळशिरस यांचे कनिष्ठ चि. विशाल व श्री. केरबा गोविंद बरकडे यांची नात व श्री केरबा बापू केरबा बरकडे रा. जळभावी, ता. माळशिरस यांची ज्येष्ठ सुकन्या चि. सौ. कां. गौरी यांचा शाही शुभविवाह सोहळा गुरुवार दि. 12/11/2026 रोजी दुपारी 01 वाजून 05 मिनिटे या शुभ मुहूर्तावर रुक्मिणी लॉन्स, माळशिरस-म्हसवड रोड, मासाळवाडी, ता. माण, जि. सातारा येथे संपन्न होणार आहे.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी शुभ कार्यास उपस्थित राहावे असे श्री. मल्हारी बाबासो कर्णवर पाटील. मा. पोलीस पाटील गोरडवाडी जळभावी., श्री. भागवत मल्हारी कर्णवर पाटील माजी चेअरमन, विकास सेवा गोरडवाडी, श्री. गोविंद मल्हारी कर्णवर पाटील प्र. उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांनी आवाहन केलेले आहे.
पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा, योग हा क्षणाचा पण, स्नेह दोन जीवांचा, मुहूर्त हा क्षणाचा पण, बंध हा रेशमाचा, आपला सहभाग क्षणाचा पण, आशीर्वाद कायमचा, ह्या मनस्वी इच्छेने या सप्तपदीच्या पवित्र बंधनातून नवजीवनाची वाटचाल सुरू करणाऱ्या या नवदांपत्यास शुभ आशीर्वाद देण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्र उपस्थित रहावे, असे आपले स्नेहांकित श्री. मल्हारी बाबा कर्णवर पाटील माजी पोलीस पाटील जळभावी, सौ. मंगल कर्णवर पाटील माजी सरपंच गोरडवाडी, व श्री. भागवत मल्हारी कर्णवर पाटील, सौ. वैशाली व श्री. गोविंद मल्हारी कर्णवर पाटील प्रभारी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज, सौ. रंजना व श्री. शशिकांत मल्हारी कर्णवर पाटील, सौ. स्वाती व श्री. विजय भागवत कर्णवर पाटील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्यावतीने शुभ कार्यास उपस्थितीत राहण्याची विनंती करण्यात येत आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे त्रिमूर्ती स्टोन क्रेशर, सजाई पेव्हर्स ब्लॉक गोरडवाडी, सजाई ॲक्वा गोरडवाडी, त्रिमूर्ती अर्थमूव्हर्स गोरडवाडी या फर्मच्या व कर्णवर पाटील, कारंडे, बरकडे परिवाराच्या वतीने व समस्त कर्णवर पाटील परिवार गोरडवाडी यांच्या वतीने शुभकार्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



