ताज्या बातम्यासामाजिक

ह. भ. प. विकास महाराज देवडे, कर्जत यांचे माळशिरस येथे सुश्राव्य कीर्तन होणार..

नगरसेवक स्व. नवनाथ उर्फ अशोक रामहरी वाघमोडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन…

नगरसेवक नवनाथ उर्फ अशोक वाघमोडे नाव घेतलं की हसरा चेहरा समोर येतो.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष स्व. नवनाथ उर्फ अशोक रामहरी वाघमोडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त बुधवार दि. 11/11/2026 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनपर कीर्तनकार ह. भ. प. विकास महाराज देवडे कर्जत यांचे 61 फाटा, वाघमोडे वस्ती, माळशिरस, ता. माळशिरस, येथे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तरी पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे वाघमोडे परिवार यांनी आवाहन केलेले आहे..

अशोक वाघमोडे नाव घेतलं की हसरा चेहरा समोर येतो. कायम हसतमुख असणारे नगरसेवक अशोक वाघमोडे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीला धावून जात असत. त्यामुळेच माळशिरस नगरपंचायतीच्या स्थापनेमध्ये पहिल्यांदा नगरसेवक होण्याचा बहुमान त्यांना मिळालेला होता. नगरसेवक अशोक वाघमोडे यांचा मनमोकळे स्वभाव होता. त्यांच्या स्वभावामुळे कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ते ताईत बनले होते. त्यांना राजकारणाबरोबर शेतीची आवड होती. बैलगाडी शर्यतीचा नाद होता. बैलगाडी शर्यतीवरून येताना अपघात झाला होता आणि त्याच अपघातामध्ये अशोकराव वाघमोडे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता.

अशोकचा मृत्यू माळशिरस पंचक्रोशीतील मित्रपरिवार नातेवाईक यांच्या मनाला चटका लावून जाणारा होता. वाघमोडे परिवार यांना अतोनात दुःख झालेले होते.

शेवटी ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. वाघमोडे परिवार व मित्रपरिवार अशोकच्या स्मृती कायम जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. 61 फाटा या ठिकाणी नगरसेवक अशोक वाघमोडे यांच्या नावाने कमान उभी केली आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पुण्यस्मरणला रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते. नगरसेवक अशोक वाघमोडे यांच्या स्मृतीस बारामती झटका परिवार यांचे कडून अभिवादन करण्यात येत आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button