Uncategorized

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांच्या सुनावणीच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे…

राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या उमेदवारी अर्जावर सत्ताधारी मोहिते पाटील गट हरकत घेतील, अशी चर्चा असताना उलटच घडलेले असल्याने उलटसुलट चर्चा सुरू…

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या निर्णयावर कोणत्या गटाला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार मंगळवारी ठरणार ?

सोलापूर ( बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाचे मदनसिंह मोहिते पाटील, शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख, बापूराव उर्फ मामासाहेब पांढरे, मालोजीराजे उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या नामनिर्देशन पत्रावर राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी छाननीच्या वेळी हरकती घेतल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी एल. एम. शिंदे यांनी हरकती फेटाळून नामनिर्देशन पत्र मंजूर केलेले होते. हरकत फेटाळली असल्याने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियम सुधारणा नियम 2007 चे नियम 27 एक नुसार जिल्हा निवडणूक अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे अपील दाखल केलेले होते. सदरच्या अपिलावर दि. 12/04/2023 रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ई ब्लॉक जिल्हाधिकारी कार्यालय आवार सोलापूर येथे जिल्हा निवडणूक अधिकारी किरण गायकवाड यांनी अपिलावर सुनावणी घेतली. दोन्ही गटाकडून वकिलांनी बाजू मांडलेली आहे. जवळजवळ तीन तास अपीलावरील सुनावणी चालू होती. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांच्या सुनावणीच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिलेले आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या निर्णयावर कोणत्या गटाला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार याचा फैसला जिल्हा निबंधक यांनी मंगळवारी निकाल दिल्यानंतर ठरणार आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत गटातून राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी अनुसूचित जाती या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. तालुक्यामध्ये उत्तमराव जानकर यांच्या खाटीक धनगर जातीच्या दाखल्याचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेला होता. त्यामुळे उत्तमराव जानकर यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली जाईल, अशी तालुक्यामध्ये चर्चा होती. मात्र, उत्तमराव जानकर यांनीच सत्ताधारी मोहिते पाटील गटातील विद्यमान सभापती मदनसिंह मोहिते पाटील, उपसभापती बापूराव उर्फ मामासाहेब पांढरे, संचालक शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख, मालोजीराजे देशमुख यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली असल्याने तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी एल. एम. शिंदे यांनी अर्जावरील हरकत फेटाळल्यानंतर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अपील केलेले होते. सदरच्या अपिलाचा निर्णय मंगळवारी होणार असल्याने राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी हरकत घेतलेली मुद्दे योग्य आहेत. वकीलांनी सुद्धा योग्य मांडणी केलेली आहे. त्यामुळे अपीलामध्ये निर्णय सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या विरोधात लागल्यानंतर सत्ताधारी गटाला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे, असे सहकार क्षेत्रातील जाणकार मंडळींकडून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button
09:47