स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माळशिरस विधानसभा अध्यक्षपदी पिसेवाडी गावचे युवा नेते नारायण बोराटे यांची निवड….

पिसेवाडी पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटेवर…
पंढरपूर (बारामती झटका)
पिसेवाडी गावाचे युवा नेते श्री.नारायण बोराटे व श्री. नानासो भाकरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आज जाहीर प्रवेश केला आहे. श्री. नारायण बोराटे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माळशिरस “विधानसभा” अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री. तानाजी (काका) बागल यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी स्वाभिमानी संघटनेचे जेष्ठ नेते श्री. मगन काळे, श्री. जब्बार आतार, पिसेवाडी गावाचे युवा नेते उमेश (काका) भाकरे, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब काळे, श्री. सतिश पिसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष आंदोलनवीर अजित (भैय्या) बोरकर, मुकुंद काळे, दादासाहेब काळे, विकास काळे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी साहेब यांनी माळशिरस तालुका कार्यकारणी बरखास्त केलेली आहे. माळशिरस विधानसभा अध्यक्षपदी नवनियुक्त पिसेवाडी गावचे युवा नेते श्री. नारायण बोराटे यांची नेमणूक केलेली असल्याने पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी अग्रेसर असणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिक जोमाने माळशिरस तालुक्यात कार्यरत राहील असा विश्वास, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमधून वर्तविला जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.