Uncategorizedताज्या बातम्या

टमटम ते फॉर्च्यूनर जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर उद्योग व्यवसायात घेतली गरुडभरारी.

येळीवसारख्या ग्रामीण भागातील शशिकांत निंबाळकर यांनी माळशिरस शहरात येऊन प्रतिकूल परिस्थितीत उद्योग व्यवसाय सुरू करून यशस्वी झाले

माळशिरस ( बारामती झटका )

येळीव ता. माळशिरस येथील सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील शशिकांत निंबाळकर यांनी ग्रामीण भागातून येऊन प्रतिकूल परिस्थितीत अपुऱ्या भांडवलावर उद्योग व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्योजक झालेले आहेत. सुरुवातीस टमटममध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ज्वारी, मका व इतर धान्य गोळा करण्याकरता फिरलेले युवा उद्योजक शशिकांत निंबाळकर आता फॉर्च्यूनरमध्ये फिरत आहेत. आजच्या युवकांनी आदर्श घ्यावा अशी आदर्शवत प्रगती व्यवसायामध्ये साधलेली आहे.

शशिकांत निंबाळकर यांनी वीस वर्षांपूर्वी शिवतेज ट्रेडर्स भुसार मालाचे दुकान सुरू केलेले होते. सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे शहरांमध्ये भुसार मालाचे व्यापाऱ्यांपर्यंत ज्वारी, गहू, मका आणण्याकरता वाहनांचा अभाव होता. ठराविक लोकांकडे बैलगाडी होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत व्यापारी लोक टमटममधून शेतकऱ्यांचा माल जमा करीत असत. प्रतिकूल परिस्थितीत शशिकांत निंबाळकर यांनी कठीण आर्थिक परिस्थितीत स्वतः टमटममध्ये जाऊन शेतकऱ्यांचे भूसार धान्य विकत आणले जात असत. जमा केलेले धान्य मोठ्या शहरांमध्ये पाठवून त्याच्यामधून दोन रुपये कमाई मिळत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत शशिकांत निंबाळकर यांनी आपली आर्थिक प्रगती साधलेली आहे.

नंतर ते भुसार मालाच्या व्यापाराबरोबर हॉटेल व लॉजिंग व्यवसायाकडे वळले होते. पुणे पंढरपूर रोडवर माळशिरस शहरानजीक शिवतेज हॉटेल आणि लॉज सुरू केलेले होते. आळंदी पुणे पंढरपूर महामार्गाच्या विस्तारीकरणात हॉटेल व लॉजची जागा भूसंपादीत झालेली आहे. सदर जागेचा मोबदला मिळालेला आहे. त्याचा पूर्वीचा भुसार मालाचा व्यापार अजूनही सुरू आहे.

शशिकांत निंबाळकर यांनी फॉर्च्यूनर गाडी घेतलेली आहे. त्यांचा प्रवास फॉर्च्यूनर गाडीतून सुरू आहे. माळशिरस शहरात त्यांनी टमटममध्ये प्रवास केलेला अनेकांनी पाहिलेला आहे. त्यामुळे फॉर्च्यूनरमध्ये पाहिल्यानंतर यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होत आहे.

टमटम ते फॉर्च्यूनर जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर उद्योग व्यवसायात गरुड भरारी घेतलेल्या युवा उद्योजक शशिकांत निंबाळकर यांचा समाजातील युवकांनी आदर्श घ्यावा, असा त्यांचा संघर्षमय प्रवास आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

  1. त्या दिवशी पण सांगितलं की त्यांच्या जमिनीतून नवीन रोड तयार केलेला आहे त्यामुळे त्यांनी ती गाडी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button