नीरा-देवधर मध्ये जळभावी गावाचा सहभाग आहे की नाही, असा प्रश्न असताना अवकाळी पावसाने सुद्धा वगळले…
तीस-पस्तीस तरुण पाणीटंचाईमुळे बोहल्यावर चढण्यापासून वंचित, कपाळावर बाशिंग कधी येईल प्रतीक्षेत तरुण आहेत..
जळभावी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावे पाण्यापासून वंचित असल्याने दुष्काळी आहेत. अशा दुष्काळी गावांसाठी निरा देवधर प्रकल्पामध्ये माळशिरस तालुक्यातील गावांचा समावेश आहे. नीरा-देवधर मध्ये जळगावी गावाचा सहभाग आहे की नाही, असा प्रश्न असताना अवकाळी पावसाने सुद्धा वगळले आहे. अवकाळी पाऊस जरी पडला तरी पिके नसल्यामुळे नुकसान होणार नाही मात्र, पावसामुळे माळरान हिरवे होऊन जनावरांना काही दिवस चारा तरी होईल. तरीसुद्धा अवकाळी पावसाने जळभावी गाव वगळलेले आहे. जळभावी गावातील 30 ते 35 तरुण सुशिक्षित आहेत तरीसुद्धा पाणी टंचाईमुळे बोहल्यावर चढण्यापासून वंचित आहेत. कपाळावर बाशिंग कधी येईल, या प्रतीक्षेमध्ये तरुण आहेत. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते या दोन लोकप्रतिनिधींच्या कार्यप्रणालीवर जळभावी गावच्या भावी पिढीचे भवितव्य अवलंबून आहे.
जळभावी गाव सोलापूर जिल्हा व सातारा जिल्हा सरहद्दीवर पर्वतरांगांच्या पायथ्याला उजाड माळरानावर वसलेले आहे. या गावाला शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडाच पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न जास्त भेडसावत आहे. गावातील अनेक कुटुंब उदरनिर्वाहाकरता स्थलांतरित असतात. गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा अडचण असते. अनेक गावांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण असते मात्र, जळवावी गावाला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि अवकाळा या चारही ऋतूमध्ये पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. जळभावी गावाला मोठे क्षेत्र आहे. मात्र पाण्यामुळे ओलिताखाली आलेले नाही. गावातील तरुण सुशिक्षित आहेत मात्र विवाहापासून वंचित आहेत. जळभावी गावाची पाणीटंचाई अशी ओळख झालेली आहे. त्यामुळे नवीन सोयरीक करण्यासाठी मुलीचे वडील धाडस करीत नाहीत. जुन्याच पाहुण्यातील नातेवाईक आपल्या मुली देण्याचे धाडस करीत आहेत. आत्ता अशी परिस्थिती आहे जुन्या नातेवाईकांकडे मुली नाहीत नवीन नातेवाईक मुली देत नाहीत अशा द्विधा मनःस्थितीत तरुण आहेत. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते या दोन लोकप्रतिनिधींनी नीरा देवधर प्रकल्पातील रखडलेल्या कॅनॉलच्या प्रश्नासाठी सातत्याने प्रयत्न करून केंद्र व राज्य सरकार त्यांच्याकडून रेंगाळलेला प्रकल्प मार्गी लावण्याचे काम सुरु केले आहे. माळशिरस तालुक्याचा पश्चिम भागातील निरा-देवधर प्रकल्पामध्ये समावेश आहे. मूळ 16 गावे प्रकल्पात आहेत. बावीस गावांचा समावेश होणार असल्याची चर्चा सुरू आहे. नीरा-देवधर संघर्ष समिती अध्यक्ष बाळासाहेब सरगर व उर्वरित गावांचा समावेश व्हावा यासाठी शिवराज पुकळे यांचा प्रयत्न सुरू आहे. दोन्हीही लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. जळभावी गावाला निरा देवधर किंवा अन्य योजनेतून पाणी आल्याशिवाय नवीन पिढीचे भवितव्य फुलणार आहे. नाहीतर नवीन पिढीचे भवितव्य टांगणीला लागलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng