राष्ट्रवादीच्या माढा लोकसभा सोशल मीडिया अध्यक्षपदी ऋषिकेश सावंत पाटील यांची नियुक्ती….

वेळापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे, राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थदादा पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरजदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी दसुर गावचे सुपुत्र ऋषिकेश सावंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माढा लोकसभा सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड केलेली आहे. सदरच्या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण यांनी ऋषिकेश सावंत पाटील यांना दिलेले आहे.
सोलापूर जिल्ह्यात व माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ऋषिकेश सावंत पाटील यांनी युवक व विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम केलेले आहे. वक्तव्य व संघटन कौशल्य चांगले असल्यामुळे ऋषिकेश सावंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने विश्वास टाकून माढा लोकसभा सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड केलेली आहे. त्यामुळे ऋषिकेश सावंत पाटील यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng