ताज्या बातम्यासामाजिक

तिरवंडी ग्रामपंचायतीचे नीरा उजवा कालवाचे उपअभियंता यांना कॅनॉलमधून पाणी सोडण्यासाठी निवेदन

…अन्यथा माळशिरस कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार

तिरवंडी (बारामती झटका)

तिरवंडी ता. माळशिरस येथील निरा उजवा कालवा ५८ फाटा कॅनॉल मधून पाणी सोडण्याबाबत निरा उजवा कालवा शाखा माळशिरसचे उप अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तिरवंडी येथे निरा उजवा कालवा ५८ फाटा कॅनल मधून शेतकऱ्यांनी पास भरूनही मागील चार महिन्यांपासून पूर्ण क्षमतेने पाणी सुटलेले नाही. तसेच ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्यासाठी योजना बंद झालेली आहे. तरी दि. २९/०८/२०२३ रोजी कॅनॉल मधून पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे. अन्यथा पाणी न सोडल्यास दि. ३१/०८/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता माळशिरस कार्यालय येथे तिरवंडी ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती नीरा उजवा कालवा शाखा फलटणचे कार्यकारी अभियंता, सोलापूरचे जिल्हाधिकारी, माळशिरसचे तहसीलदार, माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

या निवेदनावर नानासाहेब वाघमोडे, कुंडलिक वाघमोडे, पांडुरंग वाघमोडे, माऊली सरगर, महादेव वाघमोडे, जालिंदर वाघमोडे, काशिनाथ वाघमोडे, गणेश सपताळे, बाळासाहेब सपताळे, नवनाथ वाघमोडे, तानाजी वाघमोडे, सागर खरात, माने, ज्ञानेश वाघमोडे, हनुमंत वाघमोडे, महादेव वाघमोडे, लक्ष्मण वाघमोडे, हनुमंत वाघमोडे, मच्छिंद्र वाघमोडे, हिंदुराव वाघमोडे, रघुनाथ सपताळे, आबा वाघमोडे, सुभाष पाटील, धनाजी बंडगर, भाऊ वाघमोडे, सोनाली वाघमोडे, सुनीता वाघमोडे, वंदना बुद्धे, किरण सोनटक्के, रघु माने, अंकुश वाघमोडे, रामचंद्र वाघमोडे, मदन माने, पिनू वाघमोडे, भरत पाटील, राजवल्ली मुलाणी, अशोक सपताळे, राजेंद्र सरतापे, संजय वाघमोडे, शिवाजी वाघमोडे, रामचंद्र बुद्धे, लक्ष्मण, मारुती पाटील, संतोष वाघमोडे, संतोष विक्रम, मेहुद्दीन मुलाणी, रामचंद्र वाघमोडे, बाबुराव बुद्धे, भानुदास वाघमोडे, शिवाजी वाघमोडे, साहेबराव वाघमोडे, सुरेश वाघमोडे, शिवाजी पर्वते, अर्जुन वाघमोडे, शंकर वाघमोडे, निवृत्ती रुपनवर, सागर मदने, भगवान बुद्धे, शहाजहान मुलाणी, दौलत जाधव, राजेंद्र बंडगर, शंकर वाघमोडे, राजेंद्र भाऊ वाघमोडे, वसंत वाघमोडे, लक्ष्मण वाघमोडे, हनुमंत वाघमोडे, दयानंद बंडगर, मारुती वाघमोडे, अक्षय वाघमोडे, रणजीत वाघमोडे, शिवाजी वाघमोडे, साहेबराव वाघमोडे, अर्जुन वाघमोडे, सुरेश वाघमोडे, शामराव बंडगर, राजेंद्र सरगर आदी ग्रामस्थांच्या सह्या असलेले हे निवेदन आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button