ताज्या बातम्या

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी यांचा सन्मान संपन्न झाला.

माळशिरस (बारामती झटका)

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर, ता. माळशिरस, या साखर कारखान्याच्या पुनश्च व्हाईस चेअरमन पदी माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक जेष्ठविधीतज्ञ ॲड. मिलिंददादा कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल निवासस्थानी सन्मान करण्यात आला. यावेळी माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक भगवान नाना थोरात, सुरेशआबा वाघमोडे, युवा नेते काकासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते संजय जमदाडे, निळूभाऊ शिंदे, राजेंद्र वाघमोडे, कुणाल धाईंजे, शंकर आमदार वाघमोडे, रामभाऊ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

माळशिरस नगरीचे ज्येष्ठ नेते विधीतज्ञ ॲड. मिलिंददादा कुलकर्णी यांची श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल माळशिरस शहरांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यांना भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा व पाठबळ देण्याकरता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button