दगडू मनोहर पोरे गुरुजी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
श्री. दिनेश पोरे यांना पितृशोक.
माळशिरस (बारामती झटका)
स्वर्गीय दगडू मनोहर पोरे गुरुजी यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी बुधवार दि. २१/६/२०२३ रोजी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिनेश पोरे यांचे ते वडील होते.
स्वर्गीय दगडू मनोहर पोरे यांचा जन्म २०/८/१९५८ साली झालेला होता. त्यांचा मृत्यू २१/६/२०२३ रोजी झालेला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेले होते. साधी राहणी व उच्च विचारसरणी असे असणारे साने गुरुजी यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी समाजामधील अनेक विद्यार्थी घडविलेले आहेत. त्यांच्या दुःखद निधनाने पोरे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. शुक्रवार दि. ३०/६/२०२३ रोजी सकाळी ८ वाजता श्रीक्षेत्र निरा नरसिंहपुर येथे दशक्रिया विधी होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng