Uncategorizedताज्या बातम्या

माळशिरस अकलूजकरांनो कहो “दिलसे” माढ्यातून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर “फिरसे”…

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माढा लोकसभेच्या निवडणुकीचा मार्ग सुखकर होणार आहे.

माळशिरस (बारामती झटका)

संपूर्ण देशाचे निवडणुकीत लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे कार्यतत्पर व पाणीदार खासदार यांनी कार्यकाळामध्ये मतदार संघातील रखडलेले सिंचनाचे प्रश्न, रेल्वेचे प्रश्न, रस्ते, वंचित असलेल्या गावांना विकासासाठी निधी देऊन मतदारसंघात महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध केंद्रीय मंत्र्यांच्या खात्यामधून माढा लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने माढा लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामे केलेली असल्याने पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माढा लोकसभेच्या निवडणुकीचा मार्ग सुखकर होणार असून भारतीय जनता पार्टीकडून माढा लोकसभेसाठी पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचीच वर्णी लागणार असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून खात्रीलायक माहिती मिळालेली आहे. सध्या माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्याने भरघोस मताधिक्य केलेले असल्याने माळशिरस तालुक्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविषयी असंतुष्ट आत्मे वेगळी अफवा पसरवत आहेत. भाजपकडून पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेसाठी संधी मिळत असल्याने माळशिरस अकलूजकरांनो कहो “दिलसे” माढ्यातून भाजपकडून रणजीतसिंह नाईक निंबाळकर “फिरसे”अशी कट्टर भाजपच्या गोटातून चर्चा सुरू आहे. माढा लोकसभेचे प्रतिनिधित्व देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कालावधीत इंग्रजकालीन रखडलेला लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग व माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा नीरा-देवधर रखडलेला कॅनलचा प्रश्न कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकालात खऱ्या अर्थाने मार्गी लागलेले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा भंग केलेल्या असल्याने “माढा आणि शरद पवार पाडा”, अशी धुन वाजत होती. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात शरदचंद्रजी पवार निवडणुकीस उभे राहिलेले नव्हते, असा राजकीय इतिहास आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर हायमास्ट दिवे व एसटी, पिकप शेड या दोन गोष्टीकडे लक्ष केंद्रित केले असल्याची विरोधकाकडून राजकीय चर्चा सुरू होती.

दरम्यानच्या काळामध्ये मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या ताब्यातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने भाजपकडे मतदार संघ आलेला होता. या माढा लोकसभा मतदार संघात अकलूज येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सभा झालेल्या होत्या. माढा लोकसभा मतदार संघ माण, म्हसवड, फलटण, माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील काही गावे व सातारा जिल्ह्यातील काही गावे असा हा मतदारसंघ अस्तित्वात आहे. सर्वात जास्त माळशिरस तालुक्यातील मतदारांनी एक लाखापेक्षा जास्त लीड देऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून देऊन मतदारांनी विश्वास टाकलेला होता. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर रखडलेले प्रश्न सोडवलेले असल्याने जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेले आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून कार्यतत्पर व पाणीदार खासदार या मतदारसंघाचे यशस्वी पायगुनी खासदार ठरलेले आहेत. माळशिरस तालुक्याचे जीवनमान उंचावणारा फलटण पंढरपूर रखडलेला रेल्वे मार्ग व माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा निरा-देवधर प्रकल्पातील कॅनॉलचा प्रश्न या दोन प्रश्नासाठी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सातत्याने प्रयत्न करून दोन प्रश्न सोडविण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. विशेष म्हणजे या दोन्हीही प्रश्नासाठी लोकनेते स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांनीही प्रयत्न केलेले होते. एका अर्थाने वडिलांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याच कालावधीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू होऊन अंतिम टप्प्यात आलेले आहे. माळशिरस तालुक्यातील मतदारांनी भरभरून भारतीय जनता पार्टी व खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान दिलेले होते. त्या सर्व मतदारांचे ॠण कार्यातून फेडण्याचा प्रयत्न खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेला असल्याने माळशिरस तालुक्यासह माढा लोकसभा मतदार संघातील सर्वच जनतेमधून पुनश्च एकदा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort