Uncategorizedताज्या बातम्या

दुःखद वार्ता.. गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे दुःखद निधन.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रयमामा भरणे यांना मातृशोक.

भरणेवाडी ( बारामती झटका )

महाविकास आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रयमामा भरणे याच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे आज १ जूलै २०२२ रोजी सकाळी दुःखद निधन झाले आहे. आज दुपारी २ वाजता भरणेवाडी ता. इंदापूर येथे अंत्यविधी होणार आहे.

लहानपणापासून आजपर्यंत दत्तामामा भरणे यांच्या प्रत्येक सुख दुःखात यश-अपयशात पाठीशी असलेल्या आईचा आधार आज हरपला आहे. मातोश्री गिरीजाबाई यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व भरणे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button