Uncategorized

देशाची 15 वर्षे देशसेवा करून राज्यात 27 वर्ष नोकरी करून यशस्वी सेवापुर्ती केली आहे.

वन परिमंडळ अधिकारी श्री. हरिश्चंद्र विठ्ठल साळुंखे यांचा आई, वडील, पत्नी, मुले, मुली व नातेवाईक मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस येथील श्री. हरिश्चंद्र विठ्ठल साळुंखे यांनी भारत देशाची पंधरा वर्षे सेवा करून वन विभागात नोकरी करून वन परिमंडळ अधिकारी या पदावर 31 जून 2023 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. यशस्वी सेवापुर्ती सोहळा पुणे-पंढरपूर रोड निसर्ग पर्यटन केंद्र, खुडूस, ता. माळशिरस, येथे श्री. विठ्ठल साळुंखे यांच्या मातोश्री, पिताश्री, पत्नी, मुले, मुली व नातेवाईक मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत सेवापुर्तीचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनादिवशी 06 जून 2023 रोजी संपन्न झाला आहे.

सौ. नागरबाई व श्री. विठ्ठल परशुराम साळुंखे यांना हरिश्चंद्र आणि संतोष अशी दोन मुले तर शकुंतला अशोक पवार, माळशिरस, रंजना शंकर शिंदे बागेवाडी, फलटण, आशा दगडू मिसाळ पाचेगाव सांगोला, अशा तीन मुली आहेत. प्रतिकूल परिस्थितीत श्री. विठ्ठल आणि नागरबाई यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून शिक्षण दिलेले होते. श्री. हरिश्चंद्र साळुंखे यांचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण गोपाळराव देव प्रशाला, माळशिरस येथे पूर्ण झाले आहे. त्यांनी देशाची सेवा करायची, अशी मनाशी खुणगाठ बांधली आणि देश सेवेमध्ये 1983 साली भरती झाले. त्यांचा विवाह माळशिरस येथील संगीता बबनराव जाधव यांच्याशी दि. 02/12/1988 साली झालेला आहे. त्यांना स्वप्निल मुलगा व स्नेहा गायकवाड दिघी, पुणे मुलगी अशी अपत्ये आहे.

देशसेवा करीत त्यांनी 1996 साली ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले होते. देश सेवेमधून 2001 साली सेवानिवृत्त झालेले होते. देशसेवा करूनसुद्धा त्यांनी पुन्हा वन विभागाच्या पुणे विभागात 2006 साली वनरक्षक पदावर भरती झालेले आहेत. वनविभागात अलिबाग, मंगळवेढा, माळशिरस येथे काम केलेले आहे. त्यांना माळशिरस येथे कार्यरत असताना 2021 रोजी वन परिमंडळ अधिकारी पदावर बढती मिळालेली होती. दि. 31 जून 2023 रोजी वन परिमंडळ अधिकारी पदावर सेवानिवृत्त झालेले होते.

श्री. हरिश्चंद्र विठ्ठल साळुंखे यांच्या परिवारातील सदस्य, मित्र व नातेवाईक यांनी सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. सदरच्या कार्यक्रमासाठी वनविभागातील अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी येऊन सेवानिवृत्त श्री. हरिश्चंद्र विठ्ठल साळुंखे यांच्यावर यशस्वी सेवापुर्ती झाल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव केलेला होता. हरिश्चंद्र साळुंखे यांना शुभेच्छा देत असताना अनेक मान्यवरांनी देश सेवेत नोकरी केलेली असल्याने शिस्तप्रिय स्वभाव व वेळेला महत्व देत होते‌.

नोकरी करीत असताना कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमांमध्ये वेळ देत असताना तारेवरची कसरत करावी लागत होती. प्रशासनामध्ये काम करीत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळणे व कनिष्ठ अधिकाऱ्यांना समजावून घेणे, या दोन्ही बाबींचा विचार करून वनविभागामध्ये चांगल्या प्रकारे नोकरी केलेली आहे. वनविभागात नोकरी करीत असताना प्रशासन व जनता यांचा सलोखा ठेवून काम केलेले आहे. अनेक लोकांनी श्री. हरिश्चंद्र साळुंखे यांच्या कार्याबद्दल, वर्तनाबद्दल, कार्याबद्दल माहिती सांगितली होती. श्री. हरिश्चंद्र साळुंखे यांच्या सेवापुर्ती सोहळ्यासाठी मातोश्री, पिताश्री, धर्मपत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई व साळुंखे परिवारातील सदस्य उपस्थित होते. सेवापुर्ती सोहळ्यासाठी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार व नातेवाईक यांना स्नेहभोजनाचा आस्वाद दिलेला होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button