‘डीबीटी’ चे नाव वापरून ठेकेदार घुसवणाऱ्यांवर कारवाई करण्याची रयत विद्यार्थी परिषदेची मागणी

विद्यार्थ्यांना निकृष्ट साहित्य न देता डीबीटीची अंमलबजावणी करावी – ऋषिकेश कानवटे प्रमुख संघटक, रयत विद्यार्थी परिषद
पिंपरी (बारामती झटका)
महापालिका शाळातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपात डीबीटी योजना बंद करून ठेकेदार घुसविण्यात आले. ही प्रक्रिया राबविताना अनागोंदी कारभार झाला आहे. ही प्रक्रिया रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी परिषदेने केली आहे.


या संदर्भात रयत विद्यार्थी परिषदेचे प्रमुख संघटक ऋषिकेश कानवटे यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे की, राज्य शासनाकडून डीबीटी अर्थात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाभ देण्याचे आदेश आहे. त्यासाठी पाठपुरावा करून पालिक शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही डीबीटी सुरू करण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार डीबीटी सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षी त्यात त्रुटी राहिल्या. त्यामध्ये सुधारणा करून डीबीटी योजना पुढे घेवून जाणे प्रशासनाकडून अभिप्रेत होते. परंतु, तसे झाले नसून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा साहित्य खरेदीत ठेकेदार आणण्याचा प्रताप केला.
परिणामी, पुन्हा या प्रक्रियेत गैरप्रकार झाले असून विद्यार्थी शाळा सुरू झाल्यानंतर देखील वंचित राहिले आहेत. पहिल्या प्रयोगशाळेने ठरविल्यानंतर त्याच पुरवठादारांच्या साहित्याची दुसऱ्या प्रयोगशाळेतून अधिकाऱ्यांनी पुर्नचाचणी करून घेतली. पुरवठादार ठेकेदारांना सोयीस्कर भूमिका घेवून विद्यार्थ्यांच्या माथी निकृष्ट साहित्य मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अनागोंदी कारभाराची व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी व्हावी. सुरुवातीलाच चाचणीत निकृष्ट साहित्याचे नमुने देणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी. तसेच, विद्यार्थ्यांच्या हितासाठी व पारदर्शकतेसाठी डीबीटी योजना सुधारणा करून प्रभावीपणे राबवावी, असे कानवटे यांनी म्हटले आहे.


राज्य शासनाच्या आदेशानुसार डीबीटी योजना राबविण्याची मागणी आम्ही लावून धरली होती. परंतु, प्रशासनाने डीबीटी बंद करण्याचा घाट घालून शासन आदेशाचे देखील उल्लंघन केलेले आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट साहित्य न देता डीबीटीची अंमलबजावणी करावी. – ऋषिकेश कानवटे, प्रमुख संघटक, रयत विद्यार्थी परिषद
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
tipobet porn