“धमक” असणाऱ्या व्यक्तींमध्ये “चमक” आणण्याची कला उत्कृष्ट कारागिरामध्ये असते…
विझोरी (बारामती झटका)
समाजामध्ये विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये “धमक” असते. कार्यकर्तृत्वातून अंगामधील कला वापरून उत्कृष्ट कारागीर “धमक” असणाऱ्या व्यक्तींमध्ये “चमक” आणण्याचे काम करीत असतात.
पत्रकारितेमध्ये “धमक” असणारे बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनेलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना निमगाव पाटी विझोरी येथील श्लोक हेअर स्टाईल चे मालक गणेश काळे यांनी संपादक यांच्या वेशभूषेला साजेल असा दाढीला उत्कृष्ट लुक देऊन “चमक” दिलेली आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये धमक असणारे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना गणेश काळे यांनी चमक दिलेली आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/05/Screenshot_2023_0512_141510.png)
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/05/Screenshot_2023_0512_141510.png)
निमगाव पाटी विझोरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर यांच्या आशीर्वादाने व माणसातील देव माणूस अशी ख्याती असणारे गोरगरिबांचे सुप्रसिद्ध डॉ. सचिन शेंडगे यांच्या सहकार्याने विझोरी येथील नाभिक समाज संघटनेचे संघटक गणेश काळे यांनी श्लोक हेअर स्टाईल दुकान सुरू केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाशेजारी श्लोक हेअर स्टाईल असल्याने अजितभैया बोरकर यांच्या शेतकऱ्यांसाठी व सामाजिक चळवळीमध्ये काम करीत असताना सर्वसामान्य जनतेच्या केलेल्या कार्याची सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती जावी, यासाठी संपादक श्रीनिवास कदम पाटील यांची नेहमी ये-जा सुरू असते.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/05/Screenshot_2023_0512_141556.png)
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/05/Screenshot_2023_0512_141556.png)
गणेश काळे बारामती झटका वेब पोर्टलचे वाचक व युट्युब चॅनल पाहणारे प्रेक्षक आहेत. गणेश काळे आणि त्यांच्या दुकानांमध्ये हर एक नमुन्याचे ग्राहक येत असतात. त्यांच्यामध्ये चर्चा होत असते. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये बारामती झटका यांनी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. प्रत्येकाच्या मनामनात घर निर्माण केलेले आहे. वाढदिवस, लग्नसमारंभ, जागरण गोंधळ, वास्तुशांती, विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ, लोक प्रतिनिधी यांच्या चांगल्या कामाचं कौतुक व चुकीच्या गोष्टींवर प्रहार, निवडणूक प्रक्रिया, प्रचार, निकाल, राजकीय समीकरण विश्लेषण, शालेय शिक्षण गुणवत्ता, विविध खेळांच्या व व्यक्ती विकासामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रसिद्धी, अशा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय बातम्या देत असताना निर्भीड व सडेतोड वास्तववादी लेखन असते. नेहमी चर्चेत असणारे बारामती झटका न्यूज अग्रगण्य आहे. अशा वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी टोपी, जॅकेट असा वेगळा लुक तयार केलेला आहे. अशा पत्रकारितेमध्ये “धमक” असलेल्या श्रीनिवास कदम पाटील यांना दाढीचा वेगळा लूक तयार करून “चमक” आणलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/05/Screenshot_2023_0512_141431.png)
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2023/05/Screenshot_2023_0512_141431.png)