नातेपुतेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवभक्तांनी रात्रीत बसवला
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस येथे दहिगाव रोड, शंकरबझार समोर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवभक्तांनी रात्रीत बसवला.
गेल्या अनेक वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शिवप्रेमीकडुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धप्रणाकृती पुतळ्याचे चबुतऱ्यावर अनावरण केल्याने महसूल प्रशासन, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी तात्काळ हजर झाले. व त्या ठिकाणी संबंधित शिवप्रेमी यांना हा पुतळा कधी, कोणी बसवला, अशी विचारणा करू लागले. मात्र, हा पुतळा कधी व कोणी बसवला हे कोणासही माहीत नव्हते. परंतु महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा मंगळवार दि. १८ जुलै २०२३ रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांना गाफील ठेवून शिवप्रेमींकडून हा पुतळा बसविण्यात आला.
मात्र, हा पुतळा बसवल्याने सर्वधर्मीय शिवप्रेमी तसेच राजकीय, सामाजिक संघटनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बुधवार दि. १९ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून फटाक्यांची आतिषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आनंद व्यक्त करत होते. तर, एका बाजूला महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात खळबळ उडाली असून नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी तेथील पाहणी व चौकशी करून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.मात्र, नातेपुते येथे सर्वच समाजथोरांचे पुतळे बसवले आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याने नातेपुते व परिसरातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी तो आनंद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व्यक्त केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great article! I loved the humor you infused into the topic. For a deeper dive, check out this link: EXPLORE NOW. What do you think?