Uncategorizedताज्या बातम्या

पंढरीत देवशयनी एकादशीनिमित्त श्री सर्वजन हितैषी ट्रस्टच्यावतीने मोफत फराळ वाटप

साबुदाणा खिचडी, केळी, शेंगदाणा व राजगिरा लाडू, पिण्याचे शुद्ध पाण्याचे वाटप…

पंढरपूर (बारामती झटका)

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या देवशयनी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी लाखो वारकरी भाविक येत असतात. अशा भाविक वारकऱ्यांना कोलकत्ता येथील श्री सर्वजण हितैषी ट्रस्टच्या वतीने मोफत फराळाचे वाटप करण्यात येते. जगद्गुरु रामानुजाचार्य श्री झालरिया पिठाधिपती श्री श्री 1008 श्री स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून व संकल्पनेतून गेल्या सात वर्षांपासून पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या आषाढी यात्रेतील हजारो भाविकांना व वारकऱ्यांना मोफत फराळाचे वाटप करण्यात येत असते.

याचे आयोजन लक्ष्मण बागेतील व्यवस्थापक योगेश राधेश्याम शर्मा हे करतात. यंदाही मोफत फराळाचे वाटप करण्यात आले. यामध्ये साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, शेंगदाणा लाडू, केळी, आग्राचे पेठे तसेच शुद्ध पिण्याची पाण्याची बाटली असे संपूर्ण फराळाचे वाटप करण्यात येते.

या वाटपाचे नियोजन व्यवस्थापक योगेश राधेश्याम शर्मा हे करतात. यावर्षी वाटप करण्यासाठी भिवंडी येथील मोहन भोईर तसेच नागपूर येथील ओमप्रकाश सरोदे, प्रमोद शेंडे, प्रियंका गोरकर, अपूर्वा सरोदे तसेच न्यूज १८ लोकमतचे विशाल परदेशी व त्यांचे सहकारी यांचे हस्ते वाटप करण्यात आले. सदर फराळ वाटपामध्ये जगदीश टाक, धनराज पुरोहित, पुजारी नेमजी, दिनेश खंडेलवाल, सौ. रेखाकिशोरी टाक यांचे मोलाचे योगदान लाभले.

देवशयनी एकादशीनिमित्त यंदाही आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या महिला, पुरुष व जेष्ठ वारकरी भाविकांना फराळ वाटप केल्यानंतर त्यांनी श्री सर्वजण हितैषी ट्रस्टचे मनापासून आभार मानले. तसेच फराळ वाटप करताना राम कृष्ण हरी, जय हरीच्या गजरात वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी मनापासून धन्यवाद व्यक्त केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort