Uncategorizedताज्या बातम्या

पंतप्रधानानी पाठवलेल्या पोस्टकार्ड मधील प्रश्नाचे उत्तर द्यावीत – मा. रवींद्रभाऊ धंगेकर

सातारा जिल्हा युवक काँग्रेसकडून पोस्टकार्ड मोहीम.

माण- खटाव (बारामती झटका)

माण- खटाव म्हसवड शहर नगरात, सातारा युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्यावर सूडबुद्धीने केलेली कारवाई व मोदी आदानी भ्रष्टाचार संबंधी प्रश्न विचारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 5000 पोस्ट कार्ड पाठवून मोहीम शुभारंभ आमदार मा. रवींद्रभाऊ धंगेकर व महाराष्ट्रप्रदेश सचिव निलेश काटे, सातारा जिल्हाउपाध्यक्ष मा.डॉ.सागर गौतम सावंत, माण- खटाव युवक काँग्रेस उपाध्यक्ष मा.पंकज पोळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने देशभरात पोस्ट कार्ड मोहीम सुरू करण्यात आलेले आहे. आज म्हसवड शहरात युवक काँग्रेसच्या वतीने पोस्टकार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध प्रश्न विचारून उत्तर देण्यासाठी पोस्ट कार्ड पाठवण्यात आले या पोस्ट कार्ड मध्ये राहुल गांधी यांच्यावर केलेल्या अन्यापूर्वक कारवाईवरील प्रश्न व मोदी आदानी यांच्यातील भ्रष्टाचारातील संबंध यावर विविध प्रश्न पाठवण्यात आलेले आहे.
आमदार मा.रवींद्रभाऊ धंगेकर आपल्या मनोगत बोलताना म्हणाले देशाची वाटचाल हुकूमशाही कडे चालू आहे. राहुल गांधी वरील केलेली कारवाई लोकशाही विरोधी आहे.आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. आज पोस्ट कार्ड आम्ही पंतप्रधानास पाठवीत अाहे. या पोस्ट कार्ड मधून पंतप्रधानास प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे असे ते म्हणाले.

यावेळी युवक कांग्रेसचे सातारा जिल्हा कांग्रेस सरचिटणीस प्रा. विश्वंभर बाबर सर,माण अध्यक्ष बाबासाहेब माने, माझी सभापती मा. विजय बनसोडे, उपाअध्यक्ष मा.अनिल लोखंडे , नगरसेवक मा.विकास गोंजारी , विजय बनसोडे सर सरचिटणीस शिक्षक सघटणा, अध्यक्ष नागेश खांडेकर, भीमराव काळेल, वसंत शिक्रे, शिवाजी यादव , संदीप चव्हाण, बाबासाहेब बनसोडे, इतर युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button