क्रीडाताज्या बातम्या

स्वाभिमानी केसरी भव्य ओपन बैलगाडी शर्यतीचा थरार रंगणार, कोण होणार 1 लाख 51 हजार 100 रूपयाचा मानकरी…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजितभैया बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील नेत्रदीपक लढती होणार, बैलगाडी चालक-मालक, शौकीन यांना लागले वेध…

माळशिरस (बारामती झटका)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन बैलगाडी शर्यतीचे आयोजन रविवार दि. 18/05/2025 रोजी करण्यात आलेले आहे. सदरच्या भव्य ओपन बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक एक लाख 51 हजार 100 रुपयाचे बक्षीस आहे. स्वाभिमानी केसरी 2025 भव्य ओपन बैलगाडी शर्यतीमध्ये थरार रंगणार आहे. कोण होणार स्वाभिमानी केसरी, यासाठी महाराष्ट्रातील नेत्र दीपक लढती होणार आहेत. बैलगाडी चालक-मालक, शौकीन यांना स्वाभिमानी केसरीचे वेध लागलेले आहे.

अजितभैया बोरकर मित्रपरिवार यांनी भव्य ओपन बैलगाडी शर्यत विझोरी, पुणे-पंढरपूर हायवे (निमगाव पाटी), ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे आयोजित केलेली आहे. सदरच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस 01 लाख 51 हजार 100 रुपये व स्वाभिमानी केसरी 2025 चषक, द्वितीय क्रमांक 01 लाख 100 रुपये, तृतीय क्रमांक 71 हजार 100 रुपये, चतुर्थ क्रमांक 51 हजार 100 रू., पाचवे बक्षीस 31 हजार 100 रू., सहावे बक्षीस 21 हजार 100 रू‌, सातवे बक्षीस 11 हजार 100 रू‌, असे आहे.

क्वाटर फायनल साठी सुद्धा प्रथम क्रमांक 7 हजार रू., द्वितीय क्रमांक 6 रू., तृतीय क्रमांक 5 हजार रु., चतुर्थ क्रमांक 4 हजार रु., पंचम क्रमांक 3 हजार रु., सहावे क्रमांक 2 हजार रू., सातवा क्रमांक 2 हजार रु. अशी बक्षिसांची खैरात असून स्वाभिमानी केसरी मैदानासाठी कॉटर फायनल केला जाईल. कॉटर फायनल साठी प्रथम क्रमांक ते सातवा क्रमांक यांना मानाची ढाल व रोख स्वरूपात बक्षीस दिले जाणार आहे, याची सर्व बैलगाडा मालकांनी नोंद घ्यावी.

सदरच्या मैदानाचे समालोचन सुनील मोरे पेडगावकर, संपत वाघमोडे माळशिरस व झेंडा पंच बाबू धनावडे व पप्पू मंडले आहेत. प्रवेश फी 1500 रुपये आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी प्रेमकुमार जगदाळे 95 61 71 84 29, स्वप्निल बोरकर 78 40 91 4001, सिद्धांत देशमुख 95 79 72 88 79, शुभम इंगळे 73 97 85 29 51, सागर काळे 87 93 99 97 93, अच्युतराव काळे 8411004649 या नंबर वर संपर्क साधावा असे आयोजक अजितभैया बोरकर मित्रपरिवार माळशिरस तालुका यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button