परमपूज्य सद्गुरु भाईनाथ महाराज समाधी मंदिर येथील भोजनाचे शेड वादळी वाऱ्यामुळे पडले आहे..
वेळापूर (बारामती झटका)
श्री अर्धनारी नटेश्वराच्या नगरीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने व परमपूज्य डॉ. भाईनाथ महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वेळापूर पुण्यभूमीत निसर्गाची अवकृपा होऊन परमपूज्य सद्गुरु भाईनाथ महाराज यांच्या समाधी मंदिर येथे भाविकांसाठी उभारलेल्या पत्र्याचे शेड वादळी वाऱ्याने जमीन दोस्त झालेले आहे.
परमपूज्य डॉ. भाईनाथ महाराज यांनी वेळापूर पंचक्रोशीमधील अनेक भाविकभक्तांना सद्मार्गाला लावलेले आहे. परमपूज्य भाईनाथ महाराज यांच्या भक्तीचा महिमा दिवसेंदिवस वाढत असल्याने परमपूज्य डॉ. भाईनाथ महाराज यांच्या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक भाविक येत असतात. येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी भव्य पत्र्याचे शेड उभा केलेले होते. त्यामध्ये धार्मिक कार्यक्रम व भाविकांना जेवणाची सोय होत होती. वादळी वाऱ्याने सदरचे शेड जमीन दोस्त झालेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very engaging and funny! For more information, click here: LEARN MORE. Let’s chat!