पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व पाणीदार आ. बबनदादा शिंदे यांच्या शुभहस्ते माळशिरस तालुक्यात भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न होणार.
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व माढा विधानसभेचे विकासरत्न व पाणीदार आमदार बबनदादा शिंदे उभयतांच्या शुभ हस्ते 14 कोटी 76 लाखांच्या कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
श्रीपुर ( बारामती झटका)
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व माढा विधान सभा मतदार संघाचे विकासरत्न व पाणीदार आमदार बबनदादा विठ्ठलराव शिंदे या उभय मान्यवरांच्या शुभ हस्ते माढा विधानसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक 15/9/2023 रोजी दुपारी 02.30 पासून 03.15 वाजेपर्यंत भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन भावी आमदार रणजीतभैय्या बबनराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
माळशिरस तालुक्यातील खळवे ते जांभूड नेवरे रस्ता प्रजिमा 188 मध्ये सुधारणा करणे व जांभूड गावाजवळ पूल बांधणे प्रशासकीय मान्यता रक्कम 02 कोटी रुपये व ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा अर्थसहाय्य प्रकल्प कामाचे नाव वेळापूर पासून महाळुंगपर्यंत ता. माळशिरस, जि. सोलापूर किंमत 05 कोटी 95 लक्ष अशा दोन कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
माळशिरस तालुक्यातील प्रमुख राज्य मार्ग 15 पासून दसुर खळवे जांभूड नेवरे रस्ता प्रतिमा 188 किमी 2/000 ते 8/000 मध्ये सुधारणा करणे रक्कम 04 कोटी 27 लक्ष व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना माळशिरस तालुक्यातील बोरगाव ते 14 सेक्शन पर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण व देखभाल करणे एकूण लांबी 03 किलोमीटर रक्कम 02 कोटी 54 लक्ष रुपये अशा दोन कामांचा भूमिपूजन समारंभ होणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार बबनदादा शिंदे यांची विकासाची घोडदौड सुरू असल्याने माढा विधानसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील 14 गावांमध्ये दोन “दादा” रणजीतदादा व बबनदादा लोकप्रतिनिधी विषयी समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng