ताज्या बातम्यासामाजिक

ह. भ. प. प्राध्यापक युवा कीर्तनकार अमोल सुळ महाराज, मोरोची यांचे कचरेवाडी येथे सुश्राव्य कीर्तन होणार आहे..

कचरेवाडी येथील सेवाभावी व धार्मिक वृत्तीच्या स्वर्गीय सौ. कमल नामदेव सरगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन…

कचरेवाडी (बारामती झटका)

कचरेवाडी हनुमान नगर येथील स्वर्गीय सौ. कमल नामदेव सरगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रविवार दि. 17/09/2023 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये ह. भ. प. प्राध्यापक युवा कीर्तनकार अमोलजी सुळ महाराज, मोरोची यांचे सुश्राव्य कीर्तन हनुमान नगर, कचरेवाडी, ता. माळशिरस येथे होणार आहे. यावेळी कीर्तनानंतर पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी, मित्रपरिवार व नातेवाईक यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे श्री. नामदेव एकनाथ सरगर, श्री. हनुमंत नामदेव सरगर, श्री. कांतीलाल नामदेव सरगर, श्री. उमेश नामदेव सरगर व समस्त सरगर परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

स्वर्गीय सौ. कमल सरगर धार्मिक व सेवाभावी वृत्तीच्या होत्या. समाजामध्ये सुसंस्कृत व आदर्श वागणूक होती. कचरेवाडी येथे प्रतिमायाक्का चिंचणीची यात्रा भरविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळेच त्यांना सौभाग्य मरण आलेले आहे. त्यांच्या पश्चात सरगर परिवार यांनी वसा व वारसा जोपासलेला आहे. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादन संस्थेचे व्हाईस चेअरमन हनुमंतराव सरगर यांच्या मातोश्री तर कचरेवाडी ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सौ. उज्वलाताई हनुमंत सरगर यांच्या सासुबाई होत्या.

स्वर्गीय कमल सरगर यांच्या दुःखाने सरगर परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. बघता बघता वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे समस्त सरगर परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort