पुणे ते नागपूर राजकीय विमान वारी, हिवाळी अधिवेशनात गुलाबी थंडीत राजकीय उकाड्याने नेत्यांची घालमेल
राम राज्यात खासदारांचे “उत्तम” नियोजन तर आमदारांचा वेगळा “संकल्प” आहे.
नागपूर (बारामती झटका )
महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. अधिवेशन कालावधीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेटमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी चार चाकी गाडी, रेल्वे, हेलिकॉप्टर, विमान असा प्रवास करून अधिवेशनास उपस्थित राहत असतात. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पुणे येथून विमानाने जात असतात. पुणे ते नागपूर विमानामध्ये राजकीय लोकांची विमानवारी घडलेली आहे. थंडीच्या दिवसात हिवाळी अधिवेशनात गुलाबी थंडी असते, मात्र राजकीय उलथापालतीने राजकीय वातावरण गरम होत असते. त्यामध्ये उकाड्याने नेत्यांची घालमेल होत असते अशीच घालमेल राम राज्यात खासदारांचे “उत्तम” नियोजन तर आमदारांचा वेगळा “संकल्प” पाहावयास मिळालेला असल्याने राष्ट्रवादीच्या बुद्रुक व खुर्द गटामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार होते. शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांनी बंड करून आमदार सोबत घेऊन भाजपबरोबर सरकार स्थापन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे सरकार स्थापन केले आहे. पहिलेच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या पक्षामधील माजी मंत्री, माजी आमदार, खासदार, आमदारांचे नातेवाईक, विधानसभेला पडलेले उमेदवार, आजी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य नगरसेवक अशा अनेकांना भाजपमध्ये खेचण्याचे काम सुरू आहे.
भाजपमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी मधून गेलेले नेतेमंडळींचे आपले अस्तित्व वाढवून पदाला धोका होणार नाही याची दक्षता घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. रामाच्या राज्यात खासदार यांनी “उत्तम” नियोजन केलेले आहे तर आमदार यांनी वेगळा “संकल्प” केला आहे.
विशेष म्हणजे पुण्यावरून नागपूरला जाताना एकाच विमानामध्ये प्रवास करण्याची वेळ आल्याने ताकाला जाऊन मोगा लपवण्याची वेळच आली नाही. बळंच एकमेकांना काय चाललंय, म्हणण्याची वेळ आली. हे पाहण्याकरता सोलापूर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री व विद्यमान आमदार उपस्थित होते. खासदार व आमदार दोघेही रण जितातील सिंह आहेत. रामाच्या राज्यात जरी उत्तम नियोजन झाले किंवा वेगळा संकल्प केला तरी सुद्धा राजकीय दैवत देवेंद्र असल्याने राम राज्यात भविष्यात रामाला अडचण नाही, अशी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गुलाबी थंडीत गरमागरम चर्चा सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng