पुणे विभागीय मराठा सेवा संघाच्या सचिव पदी वनिता कोरटकर यांची निवड
वाघोली (बारामती झटका)
मराठा सेवा संघ पुणे विभागाची केंद्रीय कार्यकारिणीची सभा सातारा येथे संपन्न होऊन सदर सभेत अकलूज, ता. माळशिरस येथील सामाजिक कार्यकर्त्या व माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या माजी तालुकाध्यक्ष सौ. वनिता कोरटकर यांची मराठा सेवा संघाच्या पुणे विभागीय सचिव पदी निवड करण्यात आली.
सदर निवडीनंतर अकलूज येथे पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने, कार्याध्यक्ष रवींद्र पवार, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. रामचंद्र मोहिते, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ, उपाध्यक्ष सचिन पराडे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष मनोरमा लावंड, शहराध्यक्षा सौ. शुभांगी क्षीरसागर, सचिव शारदा चव्हाण, माळशिरस पंचायत समितीचे कृषी अधिकारी नितीन चव्हाण यांनी कोरटकर यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मराठा सेवा संघाचे तालुका सचिव राजेंद्र मिसाळ यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng