प्रेम भैया देवकाते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन
आ. राम सातपुते, पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्र भाऊ पाटील आणि नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती…
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते नगरीचे युवानेते प्रेमभैया देवकाते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसीय भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता नगरपंचायत प्रांगण नातेपुते येथे प्रेमभैया देवकाते पाटील युवा मंच आणि गौतम शेठ पांढरे पाटील मित्र परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये ग्रुप डान्स आणि सोलो डान्स असे गट असणार आहेत.
प्रेमभैया देवकाते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य डान्स स्पर्धा व अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते हे असणार आहेत. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन नातेपुतेचे पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्र भाऊ पाटील आणि नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत यांच्या शुभहस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितीत नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक राजेंद्र दादासाहेब उराडे, माळशिरस पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सभापती बांधकाम समितीचे अतुल पाटील, नगरसेवक दीपक काळे, नगरसेवक अण्णा पांढरे, नगरसेविका सौ. सविता बरडकर, नगरसेविका सौ. मायाव उराडे, नगरसेविका सौ. शर्मिला चांगण, नगरसेवक रावसाहेब पांढरे, मनसेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश टेळे, डॉ. नरेंद्र कवितके, राहुल शेठ पद्मन, महेश सोरटे, अतुलशेठ बावकर, उद्योजक अजित बाविसकर, उद्योजक सचिन देशमुख, सागर बिचुकले, ग्रामपंचायतचे माजी सदस्य संदीप ठोंबरे, पै. सोमा जाधव, राजेंद्र काळे, मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासो कर्चे, सामाजिक कार्यकर्ते विशाल साळवे, कुलदीप साळवे, सावता बोराटे आदी असणार आहे.
ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नगरसेवक, सभापती बांधकाम समितीचे अतुलबापू पाटील यांच्या वतीने ३१ हजार रुपये असणार आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस राहुल रुपनवर यांच्यावतीने २१ हजार रुपये असणार आहे. तृतीय क्रमांकाचे बक्षीस सिद्धिविनायक डेव्हलपरचे सचिन देशमुख यांच्यावतीने ११ हजार रुपये असणार आहे. तर सोलो डान्स स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस अजितदादा पांढरे पाटील यांच्या वतीने ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस राहुल शेठ रणदिवे यांच्या वतीने ७ हजार रुपये तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस अक्षयभैय्या ठोंबरे यांच्या वतीने ५ हजार रुपयांचे असणार आहे.
या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कन्हैया देवकाते ९९७५०९८९९८, रवी भिसे ७६२०९६००३१, सचिन वाघमोडे ९२८४८५४४८६, अजय देवकाते ९०९६०५०७०८ यांच्याशी संपर्क साधावा. तरी जास्त जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng