विझोरी येथे चि. सचिन राचकर आणि चि.सौ.कां. स्वप्नाली काळे यांच्या जुळणार रेशीमगाठी
विझोरी येथील श्री. विष्णू राचकर यांचे चिरंजीव आणि श्री. भिमराव काळे यांची सुकन्या यांचा शुभविवाह होणार संपन्न
विझोरी (बारामती झटका)
कै. कृष्णा नारायण राचकर यांचे नातू व सौ. संगीता व श्री. विष्णू कृष्णा राचकर, रा. विझोरी, ता. माळशिरस यांचे चिरंजीव सचिन आणि कै. श्रीरंग अनंता काळे यांची नात व सौ. आशालता व श्री. भीमराव श्रीरंग काळे, रा. विझोरी, ता. माळशिरस यांची सुकन्या चि.सौ.कां. स्वप्नाली यांचा शुभविवाह सोहळा मित्ती आषाढ कृ. १२ शके १९४४ सोमवार दि. २५/७/२०२२ रोजी दुपारी १२ वा. ४० मि. या शुभमुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, अकलूज-माळशिरस रोड, ६१ फाटा, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.

सदर विवाह सोहळ्याचे प्रेषक श्री. पांडुरंग ईश्वरा राचकर (उद्यान पंडित), श्री. श्रावण कृष्णा राचकर (एस. के. कन्स्ट्रक्शन), श्री. बाबुशेठ चव्हाण पाटील (उदयकीर्ती धनलक्ष्मी ज्वेलर्स, अकलूज), आणि श्री. सोपान पांडुरंग राचकर (न्यायाधीश) हे आहेत.

नजरचुकीने लग्नाच्या घाईगडबडीत जर आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहावे. तरी सदर शुभविवाह सोहळ्याप्रसंगी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहून अक्षतारूपी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन राचकर परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

