ताज्या बातम्याराजकारण

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या उपस्थितीत अकलूज येथील विजय चौकात प्रचाराच्या सभेचा शुभारंभ होणार…

महायुतीचे माढा लोकसभेचे अधिकृत उमेदवार कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ माळशिरस तालुक्यातून होणार….

अकलूज (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते महायुतीचे माढा लोकसभेचे अधिकृत उमेदवार कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या जाहीर सभेचा अकलूज येथील विजय चौकात शुभारंभ होणार आहे.

संपूर्ण देशामध्ये माढा लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरलेला आहे. गतवेळच्या निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत मोहिते पाटील परिवार होता. शिंदे बंधू विरोधी होते मात्र, यंदाच्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील विरोधी उमेदवार आहेत तर शिंदे बंधू सोबत आहेत, अशी राजकीय उलथा पालथ झालेली आहे.

देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघात विशेष लक्ष दिलेले आहे. पुनश्च माढा लोकसभा मतदार संघ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने भाजपकडेच गड राखण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस रणनीती आखत आहेत‌. मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort