बंदींना राख्या बांधून अवगुण सोडून देण्याचे केले आवाहन.
माळशिरस (बारामती झटका)
आज दिनांक ३०/८/२०२३ रोजी संपूर्ण देशात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या पवित्र दिवसाचे औचित्य साधून दैनिक तरुण भारतचे पत्रकार शोभा वाघमोडे यांनी १९ बंदी जणांना राख्या बांधून त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली व अवगुण सोडून देण्याचे आवाहन केले. यावेळी अनेक बंदी जणांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तराळले. अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. “माझी सख्खी बहिण सुद्धा आली नाही पण…” यावेळी अनेक बंदी जणांनी आपल्या बहिणीला ओवाळणी सुद्धा दिली आहे. यावेळी बहिणीने आपल्या भावांना अवगुण सोडून देण्याचे आवाहन केले.
तसेच अनेक शासकीय अधिकारी आपल्या कर्तव्यामुळे आपल्या बहिणीकडे जाता येत नसल्याने माळशिरस तहसीलदार सुरेश शेजुळ, गट विकास अधिकारी विनायक गुळवे, शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे व सर्व पोलीस स्टाफ या सर्वांना माळशिरस नायब तहसीलदार अमोल शिंदे यांच्या परवानगी जेलर खैरे जीएस यांच्या समक्ष राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wonderful analysis! Your insights are very enlightening. For those interested in further details, here’s a link: DISCOVER MORE. Keen to hear your views!