बचेरी येथे श्री लक्ष्मीदेवीच्या नवीन मंदिरात श्री लक्ष्मी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
माळशिरस तालुक्यातील बचेरी येथे सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उत्तरेला श्री बाळूमामा मंदिरालगत पुरातन काळातील श्री लक्ष्मीचे देवस्थान आहे. या ठिकाणी खडकामध्ये पूर्वीपासून एक झरा पूर्ण पाण्याने भरलेला आहे. त्यालगत एक दोन झाडाची गार सावली उन्हाळ्यामध्ये भाविकांना आपोआप मिळते.
सदर देवस्थानच्या ठिकाणी खरात बंधू व काही ग्रामस्थांनी भक्तिभावाने श्री लक्ष्मी देवीच्या मंदिराची अतिशय देखण्या स्वरूपात उभारणी केली असून बचेरीच्या वैभवात भर घालण्यासारखे सुंदर मंदिर बांधलेले आहे. आणि या मंदिरामध्ये शास्त्रोक्त व धार्मिक विधींनी श्री लक्ष्मीदेवीची मूर्ती आणून अनेक प्रकारच्या वाद्यांच्या गजरात “श्री लक्ष्मी देवीच्या नावाने चांगभलं” या गजरामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी धार्मिक विधी, कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्यात आले. मोठ्या भक्तीभावाने मंदिर बांधकामासाठी तेथील भाविक भक्तांनी श्रम घेतले. यावेळी आसपासच्या सर्व भाविकांना निमंत्रित करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आला. सदरचे मंदिर पाहिल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक भाविकभक्ताने मंदिर बांधकामाबाबत कौतुक केले. या कार्यक्रमासाठी असंख्य भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहिले होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This was a fascinating read. The points made were very compelling. Lets discuss further. Check out my profile for more engaging content!
Really wonderful information can be found on blog.Expand blog
Over 10,000 satisfied users have already skyrocketed their website traffic with us. Be the next success story—start driving real results now!
Take action today: http://realhumanwebtraffic.top