बबनराव शेंडगे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर पदी निवड
अकलूज (बारामती झटका)
जागतिक रोटरी या समाजसेवी संघटनेच्या रोटरी जिल्हा क्र. ३१३२ साठी अकलूज रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष रोटेरियन बबनराव शेंडगे यांची सन २०२४-२५ करिता असिस्टंट गव्हर्नर (A.G.) या रोटरीच्या विश्वातील मानाच्या पदी निवड झालेली आहे.
बबनराव शेंडगे हे २०१० साली अकलूज रोटरी क्लबचे सदस्य झाले. त्यांनी रोटरीच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे व त्यांच्या जनसंपर्कामुळे ते २०१२-१३ साली अध्यक्ष झाले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या विविध कामांमुळे त्यांची रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ मधील महाराष्ट्रातील ११ महसुली जिल्ह्यांमध्ये जनसंपर्क वाढला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन २०२४-२५ मध्ये होणारे गव्हर्नर डॉ. सुरेश साबू यांनी बबनराव शेंडगे यांची असिस्टंट गव्हर्नर म्हणून निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng