Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

एकनाथ शिंदे २०२४ ला सुद्धा पुन्हा मुख्यमंत्री होणार

लोकशाहीत बहुमताला महत्व, शिवसेनेला विश्वास

करमाळा (बारामती झटका)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार सुरक्षित असल्याची सुप्रीम कोर्टातून सिद्ध झाल्यामुळे करमाळा शिवसेनेच्यावतीने फटाक्याची आतिषबाजी करून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असून बहुमताचा आदर सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. मात्र, उद्धव ठाकरे गट व त्यांची नेते मंडळी तेरा आमदारांच्या जीवावर महाराष्ट्र जिंकण्याची भाषा करत आहे.

आता महाराष्ट्रातील खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची शिवसेना असून येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना-भाजप युती करून लढवण्याचा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

आमदार अपात्र करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे, याची तरतूद घटनेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला असून आता मूळ शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे. याचा आम्हाला प्रचंड आनंद झाला असून २०२४ साली निवडणुकानंतर पुन्हा मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदेच विराजमान होतील, असा आशावादी व्यक्त केला. – महेश चिवटे, जिल्हाप्रमुख शिवसेना.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort