Uncategorizedक्रीडाताज्या बातम्या

बागेवाडी येथे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ व स्व. दत्ताआप्पा वाघमारे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

बागेवाडी (बारामती झटका)

हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ व स्व. दत्ताआप्पा वाघमारे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवनेरी बहुउद्देशीय कुस्ती केंद्र बागेचीवाडी व शिवसेना माळशिरस तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पै. नामदेवनाना वाघमारे यांच्यावतीने भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन रविवार दि. २६/३/२०२३ रोजी दुपारी २ वा. शिवनेरी तालीम जवळ, अकलूज-माळशिरस रोड लगत, बागेवाडी येथे करण्यात आले आहे.

या कुस्ती मैदानाचे उद्घाटन भास्कर जाधव शिवसेना नेते माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, अमोल कीर्तिकर शिवसेना उपनेते, आर. जे. रुपनवर माजी आमदार विधान परिषद काँग्रेस, अनिल कोकीळ शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख, फत्तेसिंह माने पाटील माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर, उत्तमराव जानकर माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस, धवलसिंह मोहिते पाटील अध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस, रंजनभाऊ गिरमे चेअरमन, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड माळीनगर, आप्पासाहेब जगदाळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर, डॉ. यशवंतराव कुलकर्णी कार्य. संचालक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपुर, साईनाथ भाऊ अभंगराव शिवसेना जिल्हा समन्वयक सोलापूर, धनंजय डिकोळे शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख माढा विभाग, संभाजी शिंदे शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग, अमर पाटील शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख, पांडुरंग भाऊ देशमुख महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बाळासाहेब लवटे माजी पंचायत समिती सदस्य माळशिरस. आदी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे

या कुस्ती मैदानामध्ये राजर्षी शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर जालिंदर मुंडे आबा यांचा पठ्ठा महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील विरुद्ध प्रवीण चौधरी, इराण यांचा पठ्ठा पै. अली इराणी यांच्यात लढत होणार आहे. स्व. दत्ता आप्पा वाघमारे यांचा पठ्ठा पै. संतोष जगताप शिवनेरी तालीम अकलूज विरुद्ध हिंदकेसरी शिवराम दादा तालीम पुणे यांचा पठ्ठा पै. सुनील फडतरे यांच्यात लढत होणार आहे. स्व. दत्ता आप्पा वाघमारे यांचा पठ्ठा पै. विजय मांडवे, शिवनेरी तालीम, अकलूज विरुद्ध विष्णुपंत सावर्डे यांचा पठ्ठा पै. सचिन ठोंबरे भोसले व्यायाम शाळा, सांगली यांच्यात लढत होणार आहे. स्व. दत्ता आप्पा वाघमारे यांचा पठ्ठा पै. सतपाल सोनटक्के शिवनेरी तालीम, अकलूज विरुद्ध वस्ताद सुजित दादा हांडे पाटील यांचा पठ्ठा पै. सुदेश ठाकूर, हांडे पाटील तालीम, सांगली यांच्यात लढत होणार आहे. स्वर्गीय दत्ता आप्पा वाघमारे यांचा पठ्ठा पै. किरण माने शिवनेरी तालीम अकलूज विरुद्ध हिंदकेसरी शिवराम दादा तालीम पुणे यांचा पठ्ठा पै. आशिष वावरे यांच्यात लढत होणार आहे.

सदर कुस्ती मैदानाचे संयोजन हनुमंत (तात्या) वाघमारे, सुभाष (नाना) जाधव, अकबर तांबोळी, ॲड. वीरेंद्र (अण्णा) वाघमारे, स्वप्निल (भैया) वाघमारे, संभाजी (नाना) वरपे, संजय कांबळे, पै. विक्रम राऊत, संजय (बंडू) सातपुते, बाळासाहेब भोसले, पै. बाळासाहेब गवसणे, दत्ता झंजे, बाळासाहेब कोकाटे, मोहन कोकाटे, पै. हरिदास चव्हाण, पै. बळीराम कणसे, पै. शिवराज वाघमारे, पै. संजय महाजन, पै. ताजुद्दीन शेख, पै. हनुमंत कणसे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

सदर कुस्ती मैदानास शिवनेरी तालीमचे वस्ताद मोहन तात्या पवार, संभाजी जाधव, जयसिंह बंडगर सर (कुस्ती कोच) यांच्या सहकार्याने संपन्न होणार आहे. या कुस्ती मैदानाचे निवेदन पै. युवराज केचे हे करणार आहेत. तरी कुस्ती शौकीन, मल्ल सम्राट यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक पै. नामदेवनाना वाघमारे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

7 Comments

Leave a Reply

Back to top button