ताज्या बातम्यादेशराजकारणशहर

भाजप आमदार महेश लांडगे यांनी आकाड पार्टीच्या माध्यमातून सुरू केली भाजपची नवी संस्कृती. 

पार्ट्यांसाठी आमदार महेश लांडगेंकडे एवढा मोठा पैसा आला कुठून ? – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांचा सवाल. 

पिंपरी (बारामती झटका)

भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी तब्बल १ लाख ३७ हजार लोकांना ८ हजार किलो मटण, ८ हजार किलो चिकन व असंख्य अंडी याचे जेवण देऊन आकाड पार्टी साजरी करून भारतीय जनता पक्षाच्या नव्या संस्कृतीचा पायंडा पाडला आहे. अशा पार्ट्यांसाठी इतका मोठा पैसा येतो कुठून ? की जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी उपस्थित केला आहे. 

 रविकांत वरपे यांनी म्हटले आहे, की एवढ्या मोठ्या प्रमाणात मांसाहार करण्यासाठी १ लाख ३७ हजार लोकांना आखाड पार्टीचे जेवण दिले आहे. या माध्यमातून त्यांनी भाजपच्या नव्या संस्कृतीला सुरुवात केली आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस विकासाच्या पोकळ गप्पा मारत असतात आणि इकडे त्यांचेच आमदार महेश लांडगे लोकांना मटन, चिकन, अंडी खाऊ घालत आहेत. एवढा मोठा खर्च कशाच्या माध्यमातून केला जातो. एक साधा आमदार एक लाख ३७ हजार लोकांना कसे काय जेवण घालू शकतो ? त्याला ते कसे काय परवडते ? एवढा पैसा आला कुठून ? साध्या साध्या व्यवहारांची चौकशी करणारी ईडी एवढ्या मोठ्या जेवणावळीची चौकशी करणार आहे का ? की भाजपच्या लोकांना हे सर्व माफ असते, असा सवाल रविकांत वरपे यांनी केला आहे. 

           पिंपरी-चिंचवड शहरात पाणी प्रश्न, कचरा प्रश्न, कोयता गॅंगची दहशती यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना आमदार महेश लांडगे मात्र कार्यकर्त्यांना मटन, चिकन, अंडी खाऊ घालण्यात व्यस्त आहेत. मग पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांची विकासाची समस्या कधी सुटणार आहे ? असा प्रश्नही वरपे यांनी केला. आखाड पार्ट्यांची भारतीय जनता पार्टीची नवी संस्कृती उदयास आली आहे काय ? असा सवालही रविकांत वरपे यांनी केला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button