मराठा समाजाच्या महिलांबाबत लज्जास्पद वक्तव्य करणारे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी
मराठा समाजाच्या महिलांबाबत लज्जास्पद वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले त्यांना तातडीने अटक करून सेवेतून बडतर्फ होत नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार – महेश डोंगरे
मुंबई (बारामती झटका)
मराठा समाजाच्या महिलांबाबत अत्यंत अश्लील, लज्जास्पद व अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक श्री. किरण कुमार बकाले यांच्यावर तातडीने अटक करण्याबाबत व त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाच्या स्वरूपात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी आज मागणी केली.


सदर विषय अत्यंत गंभीरपणे लक्षवेधीत आहे. जळगावचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सोशल मीडियावर मराठा समाजाच्या महिलाबाबत अत्यंत अश्लील, लज्जास्पद व अपमान जनक वक्तव्य करून अपमानित केले आहे. याबाबत समाजात प्रचंड असंतोष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अनेक निवेदने देण्यात आली होती. बकाले यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल असतानाही व जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन नाकारूनही पोलीस यंत्रणा बकाले यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या बंधू भगिनींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.
बकालेच्या विरोधात जळगाव शहरात प्रचंड मोर्चे काढण्यात आले. सदर पोलीस अधिकारी बकाले यांनी केलेल्या बेलगाम वक्तव्यांची माहिती जळगाव जिल्ह्यातील मराठा बांधव यांनी बकाले संदर्भात फोन करत बकाले यांना बडतर्फ करण्याची मागणी दूरध्वनीद्वारे अशोक शिंदे, भीमराव मराठे, लक्ष्मण शिरसाट, हितेश टकले, नंदू रायगडे यांनी सदर प्रकरणाची माहिती दिल्यानंतर सदर विषयाचा निषेध म्हणून लोकशाही मार्गाने आंदोलन सुद्धा जिल्हाभर सुरू होते. पोलीस विभागातर्फे बकाले यांना पूर्णपणे पोलीस विभागातील अधिकारी संरक्षण देत असल्याची चित्रे दिसत होती. अनेक समाज बांधवांमध्ये बकाले यांना पोलीस विभाग पाठीशी तर घालत नाही, असाही संभ्रम तयार झाला होता.


सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे यांना महेश डोंगरे यांनी सदर घटनेबाबत निवेदन सादर केले होते. सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, आपण बकालेच्या बाबतीत तातडीने गंभीर कारवाई करून त्याच्या अटकेचे आदेश पोलीस दलात द्यावे. अन्यथा या संदर्भामध्ये मराठा समाजामध्ये प्रचंड गैरसमज निर्माण होईल. तरी कृपया आपण तातडीने दखल घ्यावी. यासंदर्भाचे निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यात आले. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी तात्काळ पोलीस महासंचालक यांना बकाले यांना बळतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

