अत्याचारातुन पिडीता गर्भवती, पोक्सो केसमधुन आरोपी निर्दोष

पुणे (बारामती झटका)
अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचारातुन ती गर्भवती होवुन गर्भाचा डि.एन.ए. आरोपीशी मॅच झाला. तथापी ही वाकड पो.स्टे. चे गु.र.नं. ३१४/२०२२ मधील आरोपी तेजस सुरेश अहिवळे याची वरील आरोपातुन मा. के. पी. क्षिरसागर साो. विशेष पोक्सो कोर्ट तथा जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे यांच्या कोर्टात निर्दोष मुक्तता झाली.
मिळालेल्या माहितीनुसार दि. १६/०४/२०२२ रोजी अल्पवयीन पिडीता तिच्या आईबरोबर वाय.सी.एम. हॉस्पीटल, पुणे येथे रूटीन चेकअपसाठी गेली असता, तेथील डॉक्टरांनी ती प्रेग्नंट असल्याचे सांगितले. तेव्हा तिच्या आईने पिडीतेला विश्वासात घेवुन विचारणा केली असता मागील १ ते ६ महिन्यापासुन आरोपीने तिच्यावर अत्याचार करून सदर बाब कोणास सांगितल्यास तिच्या घरच्यांना ठार मारणेची धमकी दिल्याचे सांगितले. त्यानुसार दि. १८/०४/२०२२ रोजी गुन्हा नोंद होवून आरोपी अटकेत होता.
पुणे जिल्हा व सत्र न्यायालय निकाल
मे. कोर्टात सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे पिडीता, तिची आई, त्याचबरोबर सर्व महत्वाचे साक्षीदार तपासले. आरोपीच्या वतीने ॲड. जी. एन. ऐवळे यांनी प्रभावीपणे केस चालवुन अंतिम युक्तीवादादरम्यान सदर आरोपी विरोधात कथित आरोप सिध्द होत नसलेची बाजु मांडली. ती ग्राह्य धरून सदरच्या पोक्सो केसमधुन आरोपीची मे. कोटीने दि. ०९/०८/२०२४ रोजी निर्दोष मुक्तता केली. याकामी ॲड. जी. एन. ऐवळे यांना ॲड. एस. डी. भोकरे, ॲड. विशाल पोकळ, ॲड. संतोष लोकरे, ॲड.आलाप ऐवळे यांनी मोलाची मदत केली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.