टाटा कंपनीमध्ये सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेजचा विद्यार्थी संस्कार सरक याची निवड..!
आम्ही फक्त शिक्षण देत नाही विद्यार्थी 100% घडवतोच – डॉ. कुमार लोंढे, संस्थापक चेअरमन
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज विद्यार्थी घडवण्यात अव्वल ठरत आहे. या कॉलेजचा ग्रामीण भागातील गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी संस्कार सरक हा टाटा कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून रुजू होत आहे. 2022-23 मध्ये विज्ञान शाखेमधून अकरावी व बारावी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण आहे. आज तो कॉलेजमध्ये आला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान होते, व आनंदाश्रू ओसंडून वाहत होते. सर्वाना पेढे वाटून संस्थापक चेअरमन यांचे दर्शन घेतले आणि म्हणाला, सर माझा पहिला पगार मी शाळेला देणार आहे, कारण आपले कॉलेज व शाळा मोठी झाली पाहिजे.
सदर विद्यार्थ्यांस तीन वर्षे इंजिनिअरिंगचा कोर्स करत असताना महिन्याला 15,800 विद्यावेतन, सर्व सोयी सुविधा (PF सह) व कोर्स पूर्ण केल्यावर नोकरीची संधी सुद्धा टाटा कंपनीमध्ये मिळणार आहे. प्रत्येक मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी टाटा कंपनी सकारात्मक आहे, तसा विश्वास डॉ. कुमार लोंढे यांना कंपनी व्यवस्थापन यांनी दिला आहे.
या सर्व निवडीसाठी टाटा कंपनीचे HR मॅनेजर मयूर सोनवणे, चेअरमन डॉ. कुमार लोंढे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. संस्कार सरक याची निवड झाल्याबद्दल संस्थेच्या सचिव डॉ. पंचशीला लोंढे, प्राचार्य के. साठे यांनी पुस्तक व पेढे भरवून विशेष सत्कार केला. प्रा. एन. सरक, प्रा. आर. वायदंडे, प्रा. ए. पठाण, प्रा. व्ही. देवकाते, प्रा. शेख सर, ए. धुमाळ सर, काळे मॅडम, अरुणा मॅडम, आकाश सरतापे इ. सर्व स्टाफने सदिच्छा देऊन स्वागत केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Hola, volia saber el seu preu.